३ मराठी मालिका येणार म्हणून ऑडिशन देण्यासाठी गेले… एका प्रसिद्ध कलाकाराने माझ्यासारख्या १०० हुन अधिक मुलींसोबत केला मोठा फ्रॉड
नमस्कार मी आरती पाटील पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होते त्यावेळी घडलेली हि घटना. शाळेत असल्यापासून मी विविध शालेय नाटकांत गॅदरींगमध्ये आवर्जून भाग घायचे. अभिनयाची आवड असल्याने आजवर बरीचशी ऑडिशन्स देखील दिली आहेत. चांगला चेहरा आणि बऱ्यापैकी अभिनय येत असूनही मला कोठेही काम मिळत नव्हतं. एकदा व्हाट्सअँपवर ३ नवीन मराठी मालिकांसाठी ऑडिशन्स सुरु असल्याचा मॅसेज पाहिला त्याच चायनलचा एक प्रसिद्ध अभिनेता मुलाखत घेणार होता. पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यास काय हरकत आहे सुदैवाने काम मिळालं तर प्रसिद्धी आणि पैसा देखील मिळेल ह्या आशेने ऑडिशन द्यायची ठरवली. पुण्यात पिंपरी भागात एका हॉटेलच्या ३ ऱ्या मजल्यावर हि ऑडिशन होती तिथे गेल्यावर माझ्यासारखेच अनेक नवोदित कलाकार हजर राहिले होते.
जवळपास ३०० ते ४०० मुले मुली आणि बरीचशी वयस्कर मंडळी ह्यावेळी हजर होती. ३ मालिका येणार ह्या आशेने बरेच कलाकार त्यांना हवे असल्याचे समजले होते त्यामुळे आपलं सिलेक्शन होऊ शकेल अशी आशा होती. एका भल्यामोठ्या हॉलमध्ये आम्ही सगळे जमलो होतो एक एक करून ते आलेल्या लोकांना आत बोलवत होते. सुदैवाने माझा नंबर लवकरच लागला. मला आत बोलावलं गेलं. मी प्रथमच त्या कलाकाराला समोर पाहिलं होत त्यांना पाहून आनंद देखील झाला. तू काय करतेस? ह्या पूर्वी कधी काम केलं आहे का? कोणत्या कॉलेजमध्ये आहेस? डान्स येतो का? असे काही प्रश्न त्यांनी विचारले. मी कॉन्फिडन्समध्ये उत्तर देत होते. माझा कॉन्फिडन्स पाहून त्यांनी माझं कौतुक देखील केलं आणि २ दिवसांत तुम्हाला कॉल करून कळवलं जाईल असं सांगण्यात आलं. मी अतिशय उत्साही होते. २ दिवसांत त्यांचा कॉल आला आणि तुमचं सिलेक्शन झालं आहे त्यासाठी तुम्हाला आज इंटरव्हिव दिलेल्या ठिकाणी यायचं आहे असं सांगितलं गेलं. मीही उत्साहात तिकडे गेले तिथे बरेच कलाकार आले होते. तिथे गेल्यावर समजलं कि तुमचं सिलेक्शन झालंय पण त्यासाठी तुम्हाला अभिनयाची ३ दिवसांची कार्यशाळा करणे गरजेचे आहे आणि ह्या कार्यशाळेसाठी तब्बल १५००० रुपयांची फी घेतली जाणार होती. मालिकेत काम भेटणार प्रसिद्धी मिळणार म्हणून १५००० द्यायला मी लगेचच तयार झाले. दुसऱ्या दिवशी कार्यशाळा देखील त्याच ठिकाणी ३ बॅचेसमध्ये होणार होती. सकाळी १० ते १२ दुसरी बॅच दुपारी ३ ते ५ आणि संध्याकाळी ७ ते ९ अश्या बॅचेस मधून मी सकाळचीच बॅच घेतली. विशेष म्हणजे त्या प्रसिद्ध चायनलमध्ये काम करणारे आणखीन एक कलाकार आम्हाला धडे देणार होते.
३ दिवसांची कार्यशाळा मी मन लावून पूर्ण केली शिकण्यासारखं बरच काही सांगितलं होत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं किती फायद्याचं आहे हेही समजलं. पण खरा स्कॅम पुढे सुरु झाला. शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला मालिकांसाठी काही फोटोज शूट करण्यास सांगितले त्यासाठी देखील १५००० रुपये लागणार असल्याचं सांगण्यात आलं. त्या फोटोंवरुनच तुम्हाला कोणता रोल योग्य बसेल असं सांगितलं गेलं. आता इथवर आलोय आणि आता फक्त फोटोशूट नंतर काम मिळेल ह्या आशेने आणखीन १५ हजार भरून फोटोशूट देखील केलं. फोटो उत्तम आले याच समाधान होत. पुढील १० दिवसांत तुम्हाला पुढेच शेड्युल सांगण्यात येईल असं कळवलं. पण १० दिवस होऊन गेले काहीच फोन आला नाही म्हणून मीच फोन केला तेंव्हा त्यांनी सांगितलं कि मालिकेचं शेड्युल पुढे ढकलण्यात आलय आणखीन १५ दिवस वेळ लागणार आहे.पण पुढच्या १५ दिवसांतच तो फोन स्वीटच ऑफ येऊ लागला. सुदैवाने मी काही मुलींचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले होते माझ्याप्रमाणेच त्यांनी देखील कार्यशाळा आणि फोटोशूट केलं होत. आम्ही मुलीं एकमेकींच्या संपर्कात होतो. पुढे एकेकीला मॅसेज येऊ लागले तुमचं सिलेक्शन झालं नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही. आता इतके पैसे खर्च करून आश्वासने देऊन त्यांनी आम्हाला मूर्ख बनवलं हे लक्षात आल. प्रत्येक बॅच मध्ये साधारण ६०-६५ जण सहभागी झाले होते. अश्या ३ बॅच होत्या म्हणजे जवळपास १२०हुन अधिक लोकांना ह्यांनी ३०००० रुपयांना गंडवल होत. म्हणजे ४ ते ५ दिवसांत ह्या कलाकाराने ३६ लाख रुपये कमावले होते. मनात राग होता म्हणून रागाच्या भरात पुन्हा कॉल केला तुम्ही आम्हाला फसवलत पोलीस कम्प्लेंट करणार आहे तेंव्हा त्यांनी असं उत्तर दिल “आम्ही रीतसर जाहिरात देऊन ऑडिशन घेतलं आहे. आम्ही कोणालाही फसवलं नाही आम्ही तुम्हाला अभिनय यावा ह्यासाठी कार्यशाळा घेतली मालिकांसाठी फोटोशूट केलं त्याचा वापर तुम्हाला पुढे होईलच कि, आजवर मी बऱ्याच नवोदित कलाकारांना कामे दिली आहेत तुम्हाला करायची तर कम्प्लेंट करा मी त्याला समोर जायला तयार आहे”. रीतसर ह्यांनी आम्हाला फसवलं आहे मालिकेत काम देतो असं सांगून कार्यशाळेसाठी पैसे घेतले फोटोशूट साठी पैसे घेतले. कम्प्लेंट करण्यात काही अर्थ नव्हता मीच मालिकेत काम मिळणार म्हणून फसले गेले. हा आज सर्रासपणे चाललेला मोठा स्कॅम आहे काम मिळणार म्हणून आपण अश्या लोकांना बळी पडतो मग हेच प्रसिद्ध कलाकार गैरफायदा घेऊन पैसे कमावतात.