serials

ठरलं तर मग मालिकेत होतेय बिगबॉस मराठीच्या या सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री

ठरलं तर मग या स्टार प्रवाहवरील मालिकेने सुरुवातीपासूनच टीआरपीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेत अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात आहेत पण अजूनही त्यांनी तशी प्रेमाची कबुली देणे टाळले आहे. दरम्यान प्रिया कडून सत्य काढून घेण्यासाठी अर्जुन आणि सायली एक नवीन नवीन डाव आखताना दिसतात. प्रिया पुरावे घेऊन त्या नेमलेल्या व्यक्तीकडे येणारच असते मात्र चैतन्य प्रियाला सावध करतो. अर्जुन आणि सायलीच्या डावात प्रिया अडकणार पण हा चैतन्य मध्ये पडून त्यांचा डाव उधळून लावतो. त्यामुळे तूर्तास तरी प्रिया कडून सत्य उलगडणार नाही असेच चित्र मालिकेतून पहायला मिळत आहे. तर तिकडे प्रिया स्वतःला या संकटातून बाहेर पडल्यामुळे चैतन्यचे आभार मानते.

ruchira jadhav in tharla tar mag serial
ruchira jadhav in tharla tar mag serial

चैतन्य कडून आणखी काही काम करून घेता येईल असा विचार साक्षी करत असते. मालिकेच्या नवीन भागात गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यात येत आहे. यावेळी मालिकेत एक नवीन ट्विस्ट आणण्यात आला आहे. अर्जुन एका मुलीची वाट पाहत असतो आता ही त्याची मैत्रीण नेमकी कोण आहे असा प्रश्न सायलीला पडतो. त्या मैत्रिणीची एन्ट्री होताच अर्जुन धावत जाऊन तिची गळा भेट घेतो. हा ट्विस्ट पाहून सायली लवकरच अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली देणार हे आता स्पष्ट होत आहे.

tharla tar mag actress ruchira jadhav
tharla tar mag actress ruchira jadhav

अर्जुनच्या या खास मैत्रिणीच्या भूमिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव झळकणार आहे. रुचिराच्या येण्याने मालिका एका रंजक वळणावर जाऊन पोहोचणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत देखील रुचिराने अशाच धाटणीची भूमिका साकारलेली पहायला मिळाली होती. त्यानंतर मराठी बिग बॉसच्या शोमध्ये झळकण्याची तिला मोठी संधी मिळाली होती. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर रुचिरा पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या एंट्रीमुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्यात नक्कीच जवळीक वाढणार आहे. त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button