चित्रपट सृष्टीची झगमग पाहून अनेकांना अभिनय करायची आवड निर्माण होते पण त्यामध्ये प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही. आयुष्यभर कमी पैश्यात काम करावं लागतं मग म्हातारपणी पैसे शिल्लक राहत नाहीत. सरकार देखील पुरेशी मदत करत नाही अशी कित्तेक उदाहरणे आपण पाहिलीच असतील. अश्याच एका मराठी अभिनेत्यावर असाच संकटांचा डोंगर उभा राहिला आहे . ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यामुळे हतबल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी ईच्छा मरणाची मागणी सरकारकडे केली होती. आजारपण, औषधांचा खर्च आणि राहण्यासाठी भाडं भरायला पैसे नसल्याने त्यांनी ही मागणी केली होती. पण आता आणखी एक नवं संकट त्यांच्यासमोर उभं आहे. माहिमकर हे गिरगावातील सदाशिव लेनमधील एका इमारतीत राहत होते. ही इमारत जुनी झाल्याने पुनर्विकास करण्यात येत आहे. २ वर्षांनी नवीन घराचा ताबा मिळणार आहे पण तोपर्यंत ते भाड्याच्या खोलीत राहत आहेत. या घराचं १३ हजार रुपये भाडं आहे. बिल्डरने बाकी सगळ्यांना भाडं देऊ केलं पण मला दिलं नाही अशी खंत ते व्यक्त करतात.
हे देखील वाचा –
कलाकार मंडळी लहान बाळाच्या मदतीसाठी धावून.. निलेश साबळे यांनी देखील केलं जनतेला आवाहन
शासनाकडून पेन्शन मिळते पण त्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घराचं भाडं, जेवण, औषधं यांचा खर्च कसा करावा ? हा प्रश्न आहे. त्यात आता भाऊ आणि वहिनीकडून त्यांना धमकी दिली जात आहे. माहिमकर म्हणतात की, “२ वर्षानंतर नवीन घराचा ताबा मिळणार आहे. पण माझा भाऊ जगदीश आणि वहिनी रेखा ती खोली विका म्हणून मागे लागले आहेत. वहिनी तर मला धमक्याही देते. हा कौटुंबिक वाद असल्याने पोलिसही यात लक्ष घालत नाहीयेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून पेन्शन मिळत होती, आता तीही बंद झाली आहे.”