serials

मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीत नव्हते….अशुतोषच्या निधनानंतरच्या टीकेला मधुराणीची प्रतिक्रिया

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणावर ट्रोल होत आहे. अरुंधतीच्या आयुष्यात एक धक्कादायक वळण येतं हे प्रेक्षकांना पचनी पडत नसतं त्यामुळे अनेकांनी मालिकेवर टीका करण्यास सुरुवात केली होती. नुकतेच या मालिकेत आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवले आहे. त्यामुळे अरुंधतीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिला हा धक्का पचवणे अजूनही जड जात असल्याने यातून तिला सावरण्यासाठी देशमुख कुटुंबाने कंबर कसली आहे. यश कांचन आजी एवढंच नाही तर अनिरुद्ध देखील अरुंधतीच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे संजनाची घालमेल प्रेक्षकांच्या समोर येऊ लागली आहे.

madhurani prabhulkar post
madhurani prabhulkar post

गेल्या काही दिवसांपासून ही मालिका आणि त्यातील कलाकार मंडळी टीकेला सामोरे जात असल्याने अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुळकर ही सोशल मिडियापासून थोडीशी लांब होती. आपण ट्रोल होणार हे माहीत असल्याने आणि मालिकेतील भावुक क्षण सतत शूट करत असल्याने तिला मानसिक ताण सहन करावा लागला होता. पण यातून वेळ काढत आज मधुराणीने एक खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहे. अशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नसल्याचं तिनेही अधोरेखित केलं. याबद्दल ती म्हणते की, “मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय आशुतोषचं ‘जाणं ‘ अनेकांना आवडलं नाहीये…कसं आवडेल…. ! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला… पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे…

aai kuthe kay karte arundhati
aai kuthe kay karte arundhati

१२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे… ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो.. हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच… डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात. अरुंधती आशुतोष ला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार गोवर्धन … ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच….!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..! तुम्ही पाहत रहा आई कुठे काय करते सोम ते शनि दुपारी २.३० वाजता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button