news

आणखी एक स्टार कीड मराठी सृष्टीत येण्यास सज्ज…दिसते आई वडिलांइतकी खूपच सुंदर

मराठी सृष्टीत स्टार किड्सची एन्ट्री होणं या गोष्टी तुरळक दिसून येतात. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाली. काही दिवसांपूर्वी अवनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकर नाटकाच्या दिग्दर्शन क्षेत्रात वळला तर मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी प्रथमच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करताना दिसत आहे. यापाठोपाठ आता मराठी सृष्टीतील आणखी एका स्टार किडची क्लासृष्टीत एन्ट्री होत आहे. अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून लोकेश गुप्ते याने मराठी सृष्टीत ठसा उमटवला आहे. तर लोकेश गुप्तेची पत्नी आणि भार्गवी चिरमुलेची बहीण चैत्राली गुप्ते हिने मराठी तसेच हिंदी मालिका सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.

lokech gupte with wife chaitrali gupte
lokech gupte with wife chaitrali gupte

त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शुभवी गुप्ते ही त्यांची मुलगी आता लवकरच अभिनय क्षेत्रातून पदार्पण करत आहे. शुभवी आणि तिचे बाबा लोकेश गुप्तेचे अनेक मजेशीर व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील. शुभवीचे कोडे आणि त्यावरील तिच्या बाबांचे उत्तर या मजेशीर गमतीजमती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतात. शुभवी उत्तम डान्सर तर आहेच पण तिला अभिनयाची देखील आवड आहे. शुभवीने नुकतीच एका नामवंत ब्रँडची जाहिरात केली. तिच्या या कामाचे सर्वांनी मोठे कौतुकही केले. एक सांगायचंय या चित्रपटात शुभवी एका बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती मात्र आता तिला प्रमुख भूमिकेसाठी मराठी सृष्टीत दाखल होण्याची इच्छा आहे. याबाबत शुभवी सांगते की मला अभिनय क्षेत्रात यायचंच आहे कारण आईवडील दोघांनाही मी लहानपणापासून या क्षेत्रात पाहत आलेली आहे त्यामुळे या क्षेत्राची एक ओढ निर्माण झाली आहे.

lokesh gupte daughter shambhavi gupte
lokesh gupte daughter shubhavi gupte

यावर लोकेश गुप्तेचं म्हणणं आहे की, शुभवी ही खूप गुणी मुलगी आहे. तिला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय याची आम्ही कधीच तिच्यावर बंधनं लादली नाहीत. तिला ज्या क्षेत्रात जाण्याची इच्छा असेल तिथे तिने काम करावं. तर चैत्राली गुप्ते या देखील हिंदी मालिका करून घरसंसार सांभाळत आहेत. शुभवी आणि लोकेशच्या सपोर्ट मुळेच मी हे करू शकले. ती खूप समजूतदार मुलगी आहे. तिच्या कामचंही लोकांकडून वेळोवेळी कौतुक होत असतं, असं त्या म्हणतात. दरम्यान शुभवी आता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची अधिक उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button