news

सर्वांची लाडकी पिंकी अडकणार लग्नबांधनात…या कलाकारासोबत नुकताच केला साखरपूडा

स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्रीने तीच्या साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही अभिनेत्री आहे शरयू सोनवणे. शरयुने पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र शरयुने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून काढता पाय घेतला. मालिका लोकप्रिय असतानाही शरयुने असे का केले? हा प्रश्न तिला विचारण्यात येऊ लागला. पण त्यानंतर आता तिचे मालिकेतून एक्झिट घेण्याचे कारण नुकतेच समोर आलेले पाहायला मिळत आहे. शरयू सोनवणे हिने जयंत लाडे सोबत साखरपुडा करून या प्रश्नाचे उत्तर तिच्या चाहत्यांना दिले आहे. जयंत लाडे हा देखील मराठी सृष्टीत कार्यरत आहे सूर सपाटा आणि पेइंग घोस्ट या चित्रपटासाठी त्याने काम केले आहे.

pinkicha vijay aso serial actress
pinkicha vijay aso serial actress

एक निर्माता म्हणून तो मराठी तसेच हिंदी सृष्टीतही काम करताना दिसतो आहे. शरयू आणि जयंत लाडे यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. त्यावर आता तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. शरयू सोनवणे हिचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. नृत्याची आवड असल्याने तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले. हेमामालिनी सोबत शरयुने मोठ्या मंचावर नृत्य सादर केले होते. आटली बाटली फुटली हा शरयूचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर महेश कोठारे यांच्या झी युवावरील प्रेम पॉइजन पंगा या मालिकेतून तिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर पिंकीचा विजय असो या आणखी एका मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकली.

actress sharayu sonawane wedding engagement photos
actress sharayu sonawane wedding engagement photos

परंतु काहीच दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली होती तेव्हा तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला पूर्वीचीच पिंकी हवी अशी तिच्याप्रति भावना व्यक्त केली जाऊ लागली. अर्थात आता सळरपुड्याच्या बातमीनंतर शरयू आणि जयंत दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत त्याचमुळे शरयुने मालिकेतून काढता पाय घेतला असे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button