news

३ इडियट्स चित्रपटातील अभिनेत्याचं स्वयंपाकघरात स्टूलवरून तोल जाऊन निधन … पत्नीने देखील मराठी चित्रपटात केलं होते काम

आमिर खानच्या थ्री इडियट्स या गाजलेल्या चित्रपटामधील अभिनेत्याचे अपघाती निधन झाले आहे. थ्री इडियट्स या चित्रपटात ग्रंथपाल दुबेच्या भूमिकेसाठी अभिनेता अखिल मिश्रा ओळखला जात होता. १९ सप्टेंबर रोजी अखिलचे अपघाती निधन झाल्याचे सांगितले जाते. अखिलच्या निधनाच्या या बातमीने त्याच्या पत्नीलाही मोठा धक्का बसला आहे. अखिल त्याच्या घरात काम करत होता त्याला तोल गेला आणि तो खाली पडला, यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री सुझान बर्नर्ट शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होती. ही बातमी ऐकून ती लगेचच घरी परतली. याबाबत अधिक माहिती अशी सांगण्यात येते की ५८ वर्षीय अखिल त्याच्या स्वयंपाकघरात काम करत होता रक्तदाबाशी संबंधित समस्यांमुळे अभिनेता काही काळ अस्वस्थ होता.

suzan barnet with akhil mishra
suzan barnet with akhil mishra

तो स्वयंपाकघरात एका स्टूलवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तो रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही तो वाचू शकला नाही आणि काही तासांनंतर त्याचा मृत्यू झाला. अखिल मिश्रा त्याच्या विविधांगी भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याच्या खोचक नजरेतून त्यांनी खलनायकी ढंगाच्या भूमिकाही निभावल्या आहेत. अखिल मिश्राची दोन लग्न झाली होती. अभिनय क्षेत्राच्या पदार्पणातच त्यांनी १९८३ मध्ये मंजू मिश्रासोबत लग्न केले होते. त्याच वर्षी धत तेरे…की आणि गृहलक्ष्मी का जिन या चित्रपट मालिकेत त्यांनी काम केले होते. १९९७ मध्ये त्यांची पहिली पत्नी मंजूचे निधन झाले. मिश्रा यांनी लेखक, निर्माता आणि अभिनेता म्हणून धत तेरे…की या मालिकेसाठी काम केले होते. त्या नंतर३ फेब्रुवारी २००९ साली जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी त्यांनी दुसरे लग्न केले.

akhil mishra wife suzan barnett
akhil mishra wife suzan barnett

३० सप्टेंबर २०११ रोजी पारंपारिक पद्धतीने त्यांनी पुन्हा लग्न केले होते. सुझानसोबत मिश्रा यांनी चित्रपट आणि मेरा दिल दिवान अशा मालिका तसेच रंगभूमीवर देखीक काम केले होते. २०१९ साली त्यांनी “मजनू की ज्युलिएट” नावाचा लघुपट बनवला होता, त्याचे लेखन, आणि दिग्दर्शन मिश्रा यांनीच केले होते. रजनी, भारत एक खोज, डॉन, यम है हम, उडान, हातीम, श्रीमान श्रीमती, सीआयडी, शिखर, कलकत्ता मेल अशा चित्रपट तसेच हिंदी मालिकांमधून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. अखिल मिश्राच्या निधनावर हिंदी कलासृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर त्यांची पत्नी सुझान या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्री सुझान बर्नर्ट यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपट काम देखील केलं होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button