लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून अभिनेत्याची रिप्लेसमेंट… मालिकेत एकामागून एक असे २ पात्र रिप्लेस

एखाद्या मालिकेची कथा आवडली म्हणजे त्या मालिकेतल्या प्रत्येक पात्राशी प्रेक्षकांची ओळख बनलेली असते. मालिकेच्या कथानकासोबतच ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली असतात. पण जेव्हा एखाद्या कलाकारांची रिप्लेसमेंट केली जाते तेव्हा मात्र त्या मालिकेतील सातत्य कुठेतरी भरकटलेलं पाहायला मिळतं. असाच काहीसा प्रकार स्टार प्रवाहच्या मालिकांच्या बाबतीत घडत आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट मालिकेत एकामागून एक असे दोन पात्र रिप्लेस केलेले पाहायला मिळाले होते. पण प्रेक्षकांनी त्या रिप्लेस केलेल्या कलाकारांना आपलंसं केलेलं दिसून आलं.

आता प्रेक्षकांची आवडती मालिका लक्ष्मीच्या पावलांनी मध्येही अशाच एका कलाकारांची रिप्लेसमेंट केली आहे. मालिकेत मुख्य नायकाचा भाऊ राहुलची भूमिका साकारणारा अभिनेता ध्रुव दातार ही मालिका सोडत आहे. एक नवीन संधी मिळाली असल्याने त्याने या मालिकेला रामराम ठोकला आहे. अर्थात या भूमिकेसाठी संधी मिळाल्याबद्दल त्याने मालिकेचे आभार मानले आहेत तर सहकलाकारांचेही त्याने आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान आता राहुलच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.

ही भूमिका आता अभिनेता अद्वैत काडने साकारणार आहे.अद्वैत काडने याने जाऊ नको दूर बाबा , फुलपाखरू, आई कुठे काय करते, नवरी मिळे हिटलरला अशा मालिकांमधून काम केलं आहे. बहुतेक मालिकेत तो विरोधी भूमिकेत पाहायला मिळाला. या मालिकेतही राहुलचे पात्र काहीसे विरोधी आहे. ध्रुव दातारनंतर अद्वैत राहुलची भूमिका उत्तम निभावू शकेल असा प्रेक्षकांना विश्वास आहे. त्यामुळे त्याला या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.