news

राजश्री मराठीच ऑफिस जळून ७० ते ८० टक्के जळून खाक… अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

राजश्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन स्टुडिओचा भाग असलेल्या वरळीतील इमारतीला रविवारी आग लागली. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याने वरळीतील अट्रिया मॉलसमोरील पूनम चेंबर्स इमारतीत भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी ११.४० च्या सुमारास ही आग लागली असल्याचे सांगितले जाते. दुपारी ३.३० च्या दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. सुदैवाने रविवार असल्याने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगितले जाते. पण राजश्री एंटरटेनमेंटच्या ऑफिसमधील जवळपास ७० ते ८० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आगीमुळे कॅमेरा, लॅपटॉप, एडिटिंग पॅनल अशा बरीचशा महागड्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

rajashree entertainment office worli poonam chembar mumbai
rajashree entertainment office worli poonam chembar mumbai

आगीची झळ पहिला, दुसरा आणि तिसऱ्या मजल्यांपर्यंत पोहोचली होती. रजत बडजात्या यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नेहा बडजात्या हे या स्टुडिओचा कारभार सांभाळतात. या स्टुडिओमार्फत अनिमेशन, व्हिडीओ कंटेंट, ऑनलाइन चित्रपटाचे प्रमोशन अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या जात होत्या. अनेक मराठी कलाकारांच्या मुलाखती या स्टुडीओमध्ये घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच ही बतनी कळताच मराठी सेलिब्रिटींनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान या आगी संदर्भात अभिनेते मिलिंद गवळी यांनीही बरीचशी माहिती समोर आणली आहे. ऑफिसचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असले तरी त्याच जोमाने इथला स्टाफ पुन्हा कामाला लागेल आणि राजश्री एंटरटेनमेंटला पुन्हा भक्कम आधार मिळेल.

milind gawali in rajashree marathi office
milind gawali in rajashree marathi office

काल संध्याकाळी बातम्या बघत असताना, एक बातमी अशी होती वरळीच्या पूनम चेंबरला आग लागली, आणि मनात एक पाल चुकचुकली, ‘तिथे तर राजश्री एंटरटेनमेंटच ऑफिस आहे’, त्या ऑफिसला तर काय झालं नसेल ना? नंतर कळलं की राजश्रीच्या ऑफिसला पण आग लागली, धक्काच बसला, खूप खूप वाईट वाटलं, आठच दिवसांपूर्वी एका स्टार प्रवाहच्या सगळ्या खलनायकांना इंटरव्यू साठी @mi_darshana ने बोलावलं होतं, म्हणजे आठच दिवसांपूर्वी तिथे चार-पाच तास त्या स्टुडिओमध्ये आम्ही होतो, राजश्री एंटरटेनमेंटचं ऑफिस म्हणजे अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं, त्या आगीमध्ये 60 ते 70 टक्के जळून खाक झालं ही कल्पनाच करणं अशक्य आहे, खरच आयुष्यामध्ये कधीही काहीही घडू शकत, राजश्री शी माझे अगदी १९८४ पासूनचे, राजबाबूं ने त्यांचं मिनिथेटर माझ्या गोविंद सरय्या दिग्दर्शित “वक्त असे पहिले” ला ट्रायल शोसाठी दिलं होतं, तेव्हापासून ते २०२४ पर्यंत माझे सातत्याने त्यांच्याशी संबंध येत गेले, या इंडस्ट्रीमध्ये राजश्री ही अतिशय सज्जन माणसांची कंपनी, ताराचंद बडजात्या, राज बाबू, आणि सुरज बडजातीया, प्रामाणिक सज्जन माणसं, खूप वर्ष यापूर्वी त्यांच्या गोडाऊन मधनं वॉचमने त्यांच्या एका चित्रपटाची प्रिंट चोरी केली होती, तेव्हा माझे वडील दादर पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर होते, आणि वडिलांनी ती प्रिंटसही सलामत त्यांना परत मिळवून दिली, तेव्हापासून राजबाबू हे माझ्या वडिलांना खूप मानायचे, माझा राजश्री मध्ये कधीही काम करण्याचा योग आला नाही, पण माझा एक चित्रपट “ठणठण गोपाळ” याच्या प्रमोशनसाठी मी पहिल्यांदा राजश्रीच्या या पूनम चेंबर्सच्या डिजिटल मार्केटिंगच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी भारावून गेलो होतो, राजश्री च्या बडजात्या कुटुंबीयांना हे खूप आधीच कळलं होतं की विश्व सगळं डिजिटल होणार आहे, म्हणून त्यांची डिजिटल मार्केटिंगची संपूर्ण टीम खूपच भारी आहे, “आई कुठे काय करते” या मालिकेच्या निमित्ताने, माझे राजश्री एंटरटेनमेंटबरोबर खूप इंटरव्यू झाले, दर्शना तांबोळी ने पुण्यामध्ये येऊ माझ्या लेक मिथिला बरोबर एक सुंदर इंटरव्यू केला होता, पर्वा तिनेच आम्हा स्टार प्रवाह वरच्या खलनायकांचा इंटरव्यू केला. या आगेबद्दल तिच्याशी मी संवाद साधला, तेव्हा ती म्हणाली “We are starting from scratch now. Nothing is left. But we will be back soon.”
आणि मला खात्री आहे की राजश्री एंटरटेनमेंचं डिजिटल ऑफिस पुन्हा नव्या जोमाने उभं राहील, they will surely come back soon. माझी ईश्वरचरणी प्रार्थना. My Prayers for strength and Success 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button