कुशल बद्रिकेचा कधिही न ऐकलेला किस्सा ऐकून सोनाली कुलकर्णीसह सगळेच झाले भावूक…मॅडनेसच्या मंचावर उपस्थितांना अश्रू अनावर
कुशल बद्रिके हा नाटक एकांकिका करत मराठी सृष्टीत जम बसवताना दिसला. चला हवा येऊ द्या या शोमधून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. जत्रा हा त्याने केलेला पहिला चित्रपट. त्याअगोदर तो नाटक, मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका करत असे. केदार शिंदे याने कुशल बद्रिकेला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आणले. या चित्रपटाने आपल्याला आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले होते अशी एक प्रांजळ कबुली त्याने दिली आहे. मॅडनेस मचाएंगे या रिऍलिटी शोमध्ये कुशलने पहिल्यांदा एक किस्सा शेअर केला आहे जो ऐकून सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, अभिजित चव्हाण यांनी कुशलच्या या डेडीकेशचं कौतुक केलं आहे. या चित्रपटाचा किस्सा ऐकून मॅडनेस मचाएंगे शोमधील कलाकार सुद्धा भावुक झाले. तो किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात.
२००५ सालच्या जत्रा चित्रपटातून कुशल बद्रिकेला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटात कुशलला एक महत्वपूर्ण भूमिका साकारायची होती. त्याला पर डे किती घेणार असे विचारण्यात आले. त्याबद्दल तो म्हणतो की, ” २००५ सालचा जत्रा हा माझा फिलावचित्रपट होता. यासाठी मला तीस दिवसांचे काम करावे लागणार होते. पर डे किती घेणार असं विचारल्यावर मी गोंधळलो होतो कारण एक छोट्या भूमिका करणारा कलाकार पर डे किती मागणार? हा प्रश्न माझ्यापुढे होता. तेव्हा त्यांनीच मला ३ हजार रुपये देण्याचे कबूल केले. पर डे ३ हजार रुपये म्हणजे ३० दिवसांचे ९० हजार मिळणार म्हणून मी खुश झालो तेव्हा त्यांनी हे फक्त तुझ पॅकेज आहे असं सांगून माझा आनंद द्विगुणित केला होता. या चित्रपटामुळे मला आर्थिक दृष्ट्या खूप मदत झाली होती. पण या चित्रपटाची एक गोष्ट मी सगळ्यांपासून लावून ठेवली होती. हा चित्रपट मला मिळाला आणि शूटिंग सुरू होणार तेव्हाच बाबा वारले. वडिलांच्या निधनानंतर मुलाला केस काढावे लागतात पण मी ते नाही केलं. अख्खा चित्रपट बनला तरी मी हे कोणाला सांगितल नाही. चित्रपट तयार झाला त्या दिवशी माझी आई चित्रपट बघायला आली होती. आपल्या मुलाचा पहिला चित्रपट म्हणून ती खूप खुश होती.
चित्रपट बघत असताना मी मागे वळून पाहिलं तर माझी आई बाबांचा फोटो हातात घेऊन अख्खा चित्रपट बघत होती. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.” कुशलचा हा किस्सा ऐकताच हुमा कुरेशी हिच्यासह उपस्थितांना भावुक व्हायला झालं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं होतं. तेव्हा कुशलला सावरण्यासाठी हुमा पुढे आली आणि तिने त्याच आत्मीयतेने कुशलला मिठी मारली. आपल्याला हिंदी इंडस्ट्रीत मिळत असलेला मान पाहून कुशल पुन्हा या कलाकारांचे कौतुक करू लागला. हिंदी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मी घाबरली होतो पण या कलाकारांनी मला आपलंसं केलं अशीही तो प्रतिक्रिया देतो.