serials

‘दार उघड बये’ मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री… मालिकेतील चंपाच्या एन्ट्रीमुळे मालिकेला येणार नवे वळण

झी मराठीवरील दार उघड बये या मालिकेत अनेक धक्कादायक ट्विस्ट आले आहेत. रावसाहेबांची जागा आता काशा बळकावू पाहत आहे. हा रावसाहेब नाही अशी शंका सगळ्यांना आलेली असते मात्र काशाचे हे गुपित कधी समोर येणार याचीच प्रेक्षक वाट पाहून आहेत. मात्र एकीकडे शरद पोंक्षे दुहेरी भूमिका साकारत असताना आता या मालिकेत चंपाची एन्ट्री होणार आहे. चंपा ही तमासगीर आहे. आणि चंपामुळे काशाचे गुपित उलगडणार अशी आशा प्रेक्षकांना आहे. त्यामुळे चंपाच्या एंट्रीवर प्रेक्षक खुश झाले आहेत. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मीरा जोशी हिने. तब्बल पाच वर्षानंतर मीरा जोशी हिचे झी मराठी वाहिनीवर पुनरागमन होत आहे. नृत्यांगना असलेल्या मीराला या मालिकेत तशीच भूमिका साकारण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळे ती या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे.

actress meera joshi in dar ughad baye serial
actress meera joshi in dar ughad baye serial

मीरा जोशी ही चित्रपट मालिका अभिनेत्री तर आहेच पण ती उत्कृष्ट नृत्य सादर करते. डान्सच्या अनेक रिऍलिटी शोमध्ये मिराने सहभाग दर्शवलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मिराने तिच्या बॉयफ्रेंड सोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सेव्ह द डेट असे म्हणत तिने ५ सप्टेंबर असे एक कॅप्शन दिले होते. त्यावरून मीरा लग्न करतीये असा तर्क लावण्यात आला होता. मात्र मीरा लग्न करत नसल्याचे ५ सप्टेंबरला उलगडले. त्या दिवशी माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड हे तिचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली होती. या गाण्यात मीरासोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर नेहुल नेरुळे झळकला आहे. तिचा हा प्रमोशनचा हटके अंदाज कामी आला असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे कारण या गण्यानंतर मिराला झी मराठीची मालिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मीरा जोशी दार उघड बये या मालिकेतून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसली आहे. याअगोदर ती तुझं माझं ब्रेकअप, प्रेमा तुझा रंग कसा, युथ अशा मालिका चित्रपटातून झळकली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button