serials

लागीरं झालं जी मालिकेतील पुष्पा मामी पुष्पा मामी आमनेसामने… खाजगी कारणास्तव मालिकेतून बाहेर पडल्याने

झी मराठीवरील श्वेता शिंदे हिची निर्मिती असलेल्या ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली होती. या मालिकेतील सर्वच कलाकार आज कुठल्या ना कुठल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेची नायिका शितली तर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘साधी माणसं’ मालिकेतून प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर याच मालिकेत पुष्पा मामींचे पात्र गाजवणाऱ्या दोन्हीही अभिनेत्री आता आमनेसामने येणार आहे. त्याला कारणही तसेच खास आहे. लागीरं झालं जी मालिकेत पुष्पा मामीची भूमिका अगोदर विद्या सावळे यांनी साकारली होती. पण खाजगी कारणास्तव त्यांनी या मालिकेतून अचानकपणे काढता पाय घेतला होता.

Kalyani Nandakishor Sonone
Kalyani Nandakishor Sonone

त्यानंतर ही भूमिका अभिनेत्री कल्याणी सोनवणे यांनी निभावलेली पाहायला मिळाली. अर्थात पुष्पा मामींचे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून होते त्यामुळे हे पात्र बद्दलताच प्रेक्षकांनी तीव्र नाराजीचा सूर उमटवला होता. पण कल्याणी सोनवणे यांनी मात्र त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेने दोघींनाही मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर या दोघीही अनेक मालिकेतून विविधांगी भूमिका साकारताना दिसल्या. पण आता या दोघीही एकाच सेटवर एकत्रित कॅमेरा शेअर करताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुष्पा मामी पुष्पा मामी आमनेसामने येणार आहेत. लवकरच सन मराठी या वाहिनीवर ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका प्रसारित होत आहे.

vidya sawale photos
vidya sawale photos

येत्या १८ मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात कल्याणी सोनवणे यांनी रत्ना आत्याची भूमिका साकारली आहे तर विद्या सावळे मायताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब हे पात्र साकारत आहेत. ज्या मालिकेतून या दोघींनी एकच पात्र गाजवले होते त्याच आता एकत्रितपणे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. मालिकेच्या निमित्ताने सेटवर या दोघींमध्ये नव्याने एक छान बॉंडिंग जुळून येईल अशी सर्वांना आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button