serials

बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्याचे मराठी सृष्टीत पुनरागमन…रत्नमालाच्या पतीच्या भूमिकेत दिसणार प्रसिद्ध अभिनेता

मराठी मालिका, चित्रपटातून पुढे जाऊन हिंदी मालिका करणारे बरेचसे मराठी चेहरे तुम्ही पाहिले असतील. अगदी निवेदिता सराफ, निशिगंधा वाड यांनीही एकेकाळी हिंदी मालिका सृष्टीतून नाव लौकिक मिळवले होते. पण मराठी सृष्टीची ओढ त्यांना पुन्हा या क्षेत्रात घेऊन आली. कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सुद्धा अशाच एका अभिनेत्याची एन्ट्री होत आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेत बरेच बदल घडून आले आहे. रत्नमालाने सुदर्शनला धडा शिकवला असून त्यांना तिने घरातूनच हाकलून दिले आहे. त्यामुळे आता मोहिते कुटुंबात सगळं काही आलबेल पाहायला मिळत आहे. राज कावेरी यांच्या सुखी संसाराची वाटचाल सुरू झाली असतानाच मालिकेत एक रंजक ट्विस्ट आणण्यात आला आहे.

bhagya dile tu mala new actor entry
bhagya dile tu mala new actor entry

भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमालाचा भूतकाळ उलगडणार आहे. त्यामुळे अनिरुद्धची यात एन्ट्री होणार आहे. राजची गाडी ज्या व्यक्तीला धडकते ती व्यक्ती म्हणजेच अनिरुद्ध मोहिते आहेत हे रत्नमालाला समजणार आहे. अनिरुद्ध हा रत्नमालाचा नवरा आहे. आता या दोघांची ताटातूट कशी झाली याची कहाणी तुम्हाला मालिकेतून पाहायला मिळणार आहे. अनिरुद्धची भूमिका अभिनेते तुषार दळवी साकारत आहेत. तुषार दळवी आणि निवेदिता सराफ यांची एकत्रित जोडी या मालिकेत दुसऱ्यांदा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. खरं तर तुषार दळवी यांनी मराठी इंडस्ट्रीत नायक म्हणून पाऊल टाकले होते. पुढे विविधांगी भूमिका साकारत तुषार दळवी यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. १९९२ सालच्या जिवलगा या चित्रपटातून तुषार दळवी यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. जिवलगा या चित्रपटाने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. कानून, श्रीमान श्रीमती, आहट, शु कोई है, हरी मिर्ची लाल मिर्ची, राधा ही बावरी, एका लग्नाची तिसरी गोष्ट , तुम्ही हो बंधू, अनुबंध अशा हिंदी मराठी मालिका त्यांनी गाजवल्या.

tushal dalvi and nivedita saraf
tushal dalvi and nivedita saraf

नॉट ओन्ली मिसेस राऊत, भेट, देवराई, सनई चौघडे, तांदळा अशा मराठी चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. मेरे साई ही हिंदी मालिका त्यांनी साईबाबांच्या भूमिकेने गाजवली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. हिंदी मालिका गाजवल्यानंतर तुषार दळवी पुन्हा एकदा मराठी सृष्टीकडे वळले आहेत. दुहेरी मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. त्यानंतर आता भाग्य दिले तू मला मालिकेत या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. अर्थात त्यांच्या काही हलक्या फुलक्या रोमँटिक सिनची झलक मालिकेतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तुषार दळवी यांना मराठी मालिकेत पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button