marathi tadka

अवधूत गुप्ते याच फार्म हाऊस पाहिलंत… स्वित्झर्लंडही फिका पडेल असे आहे फार्म हाऊसचा परिसर

लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, गायक , सूत्रसंचालक आणि संगीतकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत अवधूत गुप्ते याने मराठी सृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख बनवली आहे. खुपते तिथे गुप्ते हा त्याने सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. १९९६ सालच्या टिव्हीएस स रे ग म प च्या शोचे विजेतेपद त्याने पटकावले होते आणि इथूनच त्याचा मराठी सृष्टीतील प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. अवधूतच्या वडीलांची जाहिरात कंपनी होती. जाहिरातींची जिंगल्स लिहिणे व ती चालबद्ध करणे हे त्यांचे काम होते. अवधूतला मात्र गायन आवडायचे. अवधूतने छंद म्हणून गाणं म्हणावं पण गाण्यात करिअर करण्याचा विचार करू नये अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती.

avdhoot gupte farm house photos
avdhoot gupte farm house photos

पण अवधूतच्या गाण्याला त्याच्या आईचा पाठिंबा होता. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये त्या काळात कलेला खूप वाव मिळायचा. त्यातूनच अवधूतने गाण्याच्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला. त्यातूनच अवधूतला गाण्याच्या रिऍलिटी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. वैशाली सामंतच्या जोडीने त्याने ऐका दाजीबा हा अल्बम काढला त्याला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. झेंडा या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. सध्या सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोमध्ये तो परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या व्यस्त शेड्युलमधून एक विरंगुळा म्हणून कलाकार आपल्या आवडत्या ठिकानो जातात. अवधूत गुप्तेचं हे आवडतं ठिकाण म्हणजे भोर मधील त्याचं ‘गुप्ते फार्महाऊस’. लय दमलो की शेतावं जायचं, गाणं गायचं फ्रेस्स व्हायचं! असे म्हणत अवधूत सध्या आपला क्वालिटी टाईम एन्जॉय करतो आहे.

gupte farm bhor pune
gupte farm bhor pune

अवधुतचं हे फार्म हाऊस पाहून मात्र सेलिब्रिटींना आणि त्याच्या चाहत्यांना भुरळ घालताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जयतपाड या गावी अवधुतचे गुप्ते फार्महाऊस आहे. ह्या फार्म हाऊसचा व्ह्यूव पाहून स्वित्झर्लंडचे सौंदर्य देखील फिके पडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. भाटघर घरणाच्या जवळ असलेले हे फार्म हाऊस सध्या पावसाळ्यात तर निसर्गसौंदर्याने नटलेले पाहायला मिळत आहे. आपल्या व्यस्त कामातून एक विरंगुळा म्हणून कुठे जायचे असेल तर आपण अशाच ठिकाणांचा शोध घेत असतो. त्यामुळे अवधुतचे हे फार्म हाऊस अनेकांच्या नजरेत भरलेलं पाहायला मिळत आहे. ह्या घराचा खास लूक अवधुतने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button