news

शिवा मालिकेतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत… वडील प्रसिद्ध अभिनेते तर आई आणि बहीण देखील प्रसिद्ध अभिनेत्री

मी मराठी झी मराठी हे घराघरात पोहचलेल वाक्य आता पुन्हा सत्यात उतरवण्यासाठी झी मराठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या टॉप १० च्या यादीत देखील झी मराठीच्या एकाही मालिकेला गेल्या काही वर्षांपासून स्थान मिळवता आलं नसलं तरी येत्या काही मालिका ह्यासाठी उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळतील अशी आशा आहे. झी मराठीवर उद्या प्रस्तुत होणारी शिवा मालिका सुरु होण्याआधीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवा या मालिकेत येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील अभिनेता शाल्व किंजवडेकर पाहायला मिळणार आहे तर अभिनेत्री पूर्वा फडके हि त्याची नायिका दाखवली आहे. तिखट स्वभावाची शिवा आणि गोड स्वभावाचा आशु यांची ही कहाणी मालिकेत पहायला मिळणार आहे.

deelip welankar with wife rajani welankar
deelip welankar with wife rajani welankar

मालिकेतील तिखट स्वभावाची शिवा सर्वांचेच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे त्यात आशूची आई देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. आशूच्या आईची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी साकारली आहे. अभिनेत्री मीरा वेलणकर याना तुम्ही ह्यापूर्वी देखील झी मराठी वाहिनीवर पाहिलं असेल. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या “तू तेव्हा तशी” या मालिकेत मीराने छोटीशी भूमिका साकारली होती. मीरा वेलणकर या प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची मुलगी आहे. मधुरा, मीरा आणि गौरी अशी तीन अपत्ये त्यांना आहेत. मधुरा वेलणकर ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तर आई रजनी वेलणकर यांनी झी मराठीच्याच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आजीची भूमिका साकारली आहे.

madhura welankar deelip welankar wife rajani and meera welankar
madhura welankar deelip welankar wife rajani and meera welankar

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत साप चावून त्यांचा मृत्यू झाल्याचा भाग मालिकेत चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच आई रजनी वेलणकर झी मराठीच्या मालिकेतून बाहेर पडताच त्यांच्या मुलीची नव्या मालिकेत एंट्री झालेली पाहायला मिळत आहे.आईच्या भूमिकेमुळे मुलगी मीरा वेलणकर देखील चर्चेत आली आहे. झी मराठीच्या मालिका सुरवातीला सर्वानाच हव्या हव्याश्या वाटतात पण पुढे त्या रेंगाळत चालतात पाह शिवा मालिका प्रेक्षकांची हिरमोड करणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्या म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणारी नवी मालिका शिवा आणि त्यातील कलाकारांना खूप खूप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button