news

घटस्फोटानंतर पुन्हा एक्स बॉयफ्रेंड सोबत दिसली सानिया मिर्झा फोटो होत आहेत व्हायरल

क्रीडा विश्व असो की मनोरंजन विश्व या सगळ्यांचे खाजगी आयुष्य सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत आले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्याही घटस्फोटाची बातमी चांगलीच चर्चेत राहिली होती. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ने अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तिसरे लग्न केले. तेव्हा शोएबने सानिया मिर्झाला घटस्फोट दिला अशी बातमी जगजाहीर झाली. गेली वर्षभर या दोघांमध्ये काहीतरी बिनसलय याचा अंदाज चाहत्यांनी बांधलेला होता. त्यानंतर सानिया मिर्झा हिनेच शिएबला घटस्फोट दिला असे बोलले जाऊ लागले. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया तिच्या मुलासह भारतात परतली आहे.

sania mirza and sohrab mirza
sania mirza and sohrab mirza

पण आता दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा ती पुन्हा त्याच नव्या उमेदीने कामाला लागलेली आहे. नुकतेच एक्स पार्टनरच्या पार्टीत सानियला स्पॉट करण्यात आले तेव्हा एक्स पार्टनरसोबत सानियाने पापाराझीला फोटो काढण्यासाठी पोज दिली. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. रोहन बोपन्न हा सानियाचा टेनिस मधील एक्सपार्टनर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी स्पर्धेत रोहन बोपन्नाने विजेतेपद पटकावले. त्यानिमित्ताने रोहनने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सानिया एक्स पार्टनर सोबत मीडियाला पोज देताना दिसली. शुक्रवारी उद्योगपती आनंद पिरामल, टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पुरव राजा यांच्यासोबत पिकलबॉल सामन्यात सामील झाला होता.

sania mirza and sohrab
sania mirza and sohrab

पिकलबॉल हा एक खेळ टेनिससारखाच आहे जो घरामध्ये आणि घराबाहेर खेळला जाऊ शकतो. यावेळी सानिया मिर्झाने उत्स्फूर्त सहभाग दाखवला होता. घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानिया एका नवीन पार्टनरच्या शोधात आहे असे बोलले जात आहे. सोहरब मिर्झा हा तिचा एक्स बॉयफ्रेंड होता. शोएब मलिक सोबत लग्न बंधनात अडकण्याअगोदर सोहरब सोबत ती लग्न करणार असे बोलले जात होते. पण लग्नागोदरच दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि २०१० मध्ये तिने शोएब मलिक सोबत थाटात लग्न केलं. १४ वर्षांच्या त्यांच्या सुखी संसाराला तडा गेला आणि शोएबच्या आयुष्यात सना जावेद ही अभिनेत्री आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button