news

या मराठी अभिनेत्याला आलीय अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका

उद्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची सर्वत्रच चर्चा सुरू झालेली आहे. मोठमोठे सेलिब्रिटी, परदेशी पाहुणे या लग्नाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचे दर वाढवलेले आहेत. प्रिवेडिंग, हळद , संगीत सोहळ्यावेळी बॉलिवूडचे सेलिब्रिटी आवर्जून हजेरी लावताना पाहायला मिळाले. अख्खी बॉलिवूड सृष्टीच इथे अवतरलीये असेच काहीसे चित्र जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये पाहायला मिळत आहे. या खास लग्नाला एका मराठी अभिनेत्याची देखील उपस्थिती असणार आहे. नुकतेच चारचौघी नाटक अभिनेता श्रेयस राजे ह्याला अंबानीकडून लग्नाचे खास आमंत्रण मिळाले आहे. ‘आता जावं लागेल लग्नाला!’ असे म्हणत श्रेयसने अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ambanis wedding card to shreyas raje
ambanis wedding card to shreyas raje

लग्नाचे खास आमंत्रण आपल्याला मिळाले म्हणून श्रेयस भारावून गेला आहे. ‘ तर ही दस्तुरखुर्द मुकेश अंबानी यांच्या मुलाची लग्नपत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंट कडून एक अख्खा माणूस अपॉइंट केला होता. जो वांद्र्याहून घोडबंदर पर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला. क्रेझी मॅनेजमेंट”. असे म्हणत श्रेयसने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे आता श्रेयसला ही लग्नपत्रिका कशी काय मिळाली यावर एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका त्याला मिळण्याचे कारण काय? असेही प्रश्न त्याला विचारण्यात येऊ लागले आहेत. दरम्यान यावर श्रेयसने अजून तरी मौन बाळगले आहे पण यामागचे कारण जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. ती परत आलीये, बाबांची शाळा अशा मालिका चित्रपटातून श्रेयसने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या तो नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण उद्या पार पडणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याला श्रेयसची हजेरी असणार हे मात्र निश्चित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button