news

तू सतत एवढया बायकांसोबत असतोस तुझ्या बायकोला याचा प्रॉब्लेम होत नाही का…प्रश्नावर स्वप्नीलचं खास उत्तर

उद्या १२ जुलै रोजी ‘ बाई गं’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, सुकन्या कुलकर्णी, नम्रता गायकवाड, नेहा खान, आदिती सारंगधर, सागर कारंडे अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांनी ठीक ठिकाणी जाऊन जोरदार प्रमोशनची तयारी केली आहे. नुकतेच नाशिक येथील गोदा काठी जाऊन कलाकारांनी आरती केली होती. तर यानिमित्ताने मीडिया माध्यमातूनही प्रमोशनची तयारी सुरू आहे. अशाच आरपारला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहरेने स्वप्नील जोशीचा एक किस्सा इथे सांगितला.

swapnil joshi photos
swapnil joshi photos

स्वप्नील जोशी हा मराठीचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो. बाई गं या चित्रपटानंतर तो नवरा माझा नवसाचा २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दुनियादारी या त्याच्या गाजलेल्या चित्रपटाचा पार्ट २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या पडद्यावर स्वप्नील जोशीचंच नाव चर्चेत असणार आहे. दरम्यान स्वप्नील जोशी कित्येकदा अभिनेत्रींसोबत वेळ घालवताना दिसत असतो. त्याच्या आजूबाजूला सतत महिलांचा, मैत्रिणींचा वावर असतो. अशाच एका मुलाखतीत त्याला याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘ तू सतत एवढ्या बायकांसोबत असतोस, चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातोस, तुझ्या बायकोला लिनाला याचा प्रॉब्लेम होत नाही का?’

swapnil joshi family photos
swapnil joshi family photos

त्यावर स्वप्नील जोशीचे उत्तर होते की, ‘ इतके वर्ष ती मला हेच करताना बघत आलीये आणि ती ते करू देतीये मला , इथेच कळतं ना की मला माझ्या बायकोशी काय रिलेशन आहे. यातूनच कळलं की मी तिचं मन जिंकलंय.’ प्रार्थना बेहरे हे सांगताना अजून एक गोष्ट ऍड करते की ‘त्याने कृष्णाची भूमिका साकारली आहे त्यामुळे त्याला बायकांची मनं कशी असतात ते माहिती आहे.’ काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेची पत्नी मंजिरी हिने याबद्दलही एक वक्तव्य केलं होतं. जेव्हा कधी सुबोध मालिका चित्रपटातून कासम करतो आणि नायिकेसोबत जवळचे सीन्स असतात तेव्हा मी इनसिक्युअर असते असे तिचे याबाबतीत म्हणणे होते. याबाबतीत मात्र स्वप्नील जोशी लकी ठरला असं म्हणायला आता हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button