serials

अभिनेत्री सोनाली खरे आणि चला हवा येउ द्या फेम तुषार देवल यांच्यात आहे हे खास नातं…

मराठी सृष्टीत बऱ्याच कलाकारांमध्ये नातेसंबंध तुम्हाला पाहायला मिळतील. हिंदी सृष्टीत अभिनयाचा वारसा जपणाऱ्या कलाकारांची रिघच असते मात्र मराठी सृष्टीत अशा गोष्टी तुरळक पाहायला मिळतात. अशीच एक अपरिचित असलेली मराठी सृष्टीतील भावा बहिणीची जोडी जाणून घेऊयात. ज्यांनी आजवर कधीच आपण बहीण भावंडं आहोत हे उघड केलेले नाही. मात्र तुषार देवलच्या पत्नीने म्हणजेच स्वाती देवल हिने याचा खुलासा एका मुलाखतीत केलेला आहे. स्वाती देवल ही मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे तर तुषार देवल चला हवा येऊ द्या मध्ये संगीत दिग्दर्शनाचे काम करतो. नुकतेच या दोघांचे “गौराई आलिया माहेरा” हे गाणं युट्युबवर रिलीज करण्यात आलं. सायली कांबळे हिने हे गाणं गायलं असून स्वाती देवल आणि स्वाती पानसरे या सर्वजणी या गाण्यात झळकल्या आहेत. या गाण्याच्या निमित्ताने स्वातीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे.

tushar deval and sonali khare
tushar deval and sonali khare

या मुलाखतीत तिने सोनाली खरे आणि माधवी निमकर यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केलेला पाहायला मिळाला. स्वाती आणि सोनाली खरे या दोघीही बालपणापासून एकमेकांना ओळखत होत्या. एकाच शाळेत आणि एकच बेंचवर त्या बसत असत. एवढंच नाही तर दोघींचे डान्स क्लास आणि अभ्यासाचे क्लासेस देखील एकच होते. त्यामुळे दोघींची अगदी घट्ट मैत्री होती. पुढे सोनालीने मराठी सृष्टीत जम बसवला तर स्वाती सुद्धा अभिनय क्षेत्रात दाखल झाली यावेळी एका नाटकाच्या तालमीदरम्यान तुषार देवलशी तिची भेट झाली. स्वातीला पाहताक्षणी तुषार तिच्या प्रेमात पडला. पुढे दोघांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर स्वातीला कळालं की सोनाली ही तुषारची मावसबहीण आहे. सोनाली खरे आणि माधवी निमकर या दोघी सख्ख्या मावस बहिणी आहेत हे नातेसुद्धा स्वातीला खूप उशिरा समजले होते असे ती या मुलाखतीत सांगते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button