marathi tadka

रंजना सोबत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीला ओळखलं…मुलगी होती प्रसिद्ध अभिनेत्री तर नात देखील

व्ही शांताराम निर्मित आणि किरण शांताराम दिग्दर्शित ‘झुंज’ हा मराठी चित्रपटात १९७५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रंजना आणि रविंद्र महाजनी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. रंजनाचा हा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता त्याअगोदर ती चंदनाची चोळी अंग अंग जाळी मधून सहाय्यक भूमिकेत दिसली होती. झुंज चित्रपटात एक कानडी पात्र दाखवण्यात आले होते. हे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांनी निभावले होते. मंदाकिनी भडभडे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उठावदार भूमिका केल्या. विनोदी तसेच खाष्ट, कजाग भूमिकांसाठी त्या ओळखल्या जात असत. अपराध, झुंज, वाट चुकलेले नवरे, अन्नपूर्णा, अरे संसार संसार, नवरे सगळे गाढव, मुंबईचा फौजदार अशा मराठी चित्रपटातून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

mandakini bhadbhade with ranjana
mandakini bhadbhade with ranjana

याशिवाय सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, भटाला दिली ओसरी अशा दर्जेदार नाटकांतून त्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या. विशेष म्हणजे मंदाकिनी भडभडे यांनी १९४९ च्या सुमारास सीआयडी कार्यालयात काही काळ नोकरी केली होती. नोकरी करत असताना नाटकाची आवड त्या जोपासत होत्या. बालगंधर्व, दामू केंकरे, ज्योत्स्ना भोळे, दाजी भाटवडेकर, प्रभाकर पणशीकर, सतीश दुभाषी अशा अनेक नामवंत कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. २०११ साली वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयाच्या तीव्र झटक्याने मंदाकिनी भडभडे यांचे निधन झाले होते. त्यांची मुलगी नयन म्हणजेच रिमा लागू यांनीही आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राची वाट धरली. आपल्या मुलीने आधी शिक्षण पूर्ण करावे असा आग्रह मंदाकिनी भडभडे यांचा होता. त्यामुळे नयनला त्यांनी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत ठेवले होते. पण अभिनयाची आवड असलेल्या नायनने नाटकातून अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली. अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी मुंबईत आल्यानंतर युनियन बँकेत नोकरी केली.

ranjana with daughter mrunamayee
ranjana with daughter mrunamayee

पण पूर्ण वेळ अभिनयाला द्यायचा म्हणून त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. दरम्यान नाटकातील सहकारी विवेक लागू यांच्याशी नयनने प्रेमविवाह केला, तेव्हा नयनच्या त्या रिमा लागू झाल्या. मंदाकिनी भडभडे यांनी त्यांच्या अभिनयाने खाष्ट, विनोदी भूमिका रंगवल्या त्याच्याच दुसऱ्या बाजूला रिमा लागू यांनी प्रेमळ आईच्या भूमिका गाजवल्या. आजही त्या बॉलिवूड सृष्टीची आई अशीच ओळख मिळवतात. २०१७ साली रिमा लागू यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तर रिमा लागू यांची मुलगी आणि मंदाकिनी भडभडे यांची नात मृण्मयी लागू ही देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाली. मोजकेच मराठी चित्रपट केल्यानंतर मृण्मयीने अभिनय क्षेत्र सोडून लेखन क्षेत्राकडे पाऊल वळवले. मृण्मयी सध्या अनेक हिंदी चित्रपट, वेबसिरीजसाठी रायटर म्हणून काम करते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button