माझं नाव संजय जाधव सोबत जोडलं गेलं पण मी …तेजस्विनी आणि संजय जाधव सोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सोडलं मौन
कुठल्याही गोष्टींसाठी अभिनेत्रीला ट्रोल करणं या गोष्टी आता सर्रासपणे पाहिल्या जातात. अगदी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे एव्हरग्रीन कपल सुद्धा आता सोशल मीडियावर सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले आहेत. या ट्रोल करणाऱ्यांना दुर्लक्ष केले पाहिजे असे मत तेजस्विनी पंडित हिने व्यक्त केलं आहे. तेजस्विनी पंडित हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. संजय जाधव सोबतचे अफेअरच्या चर्चा असो किंवा स्वतः लग्न कधी करणार या सर्वच गोष्टींवर तेजस्विनीचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊयात… काही दिवसांपूर्वीच तेजस्विनीने टोल विरोधात आवाज उठवला होता, तेव्हा तिच्या ट्विटरवरची ब्ल्यू टिक हटवण्यात आली होती. पण तेव्हा राज ठाकरे यांनी स्वतः फोनकरून तेजस्विनीच्या धाडसाचे कौतुक केले होते.
ती म्हणते की, “या ट्विट नंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला, तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं होतं. एक अभिनेत्री म्हणून तू हे बोललीस कलाकारांनी यावर बोललं पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की त्यांना राज ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री नाही मिळाला.” पुढे तेजस्विनी ट्रोलिंगवरही असे म्हणते की, “सुरुवातीला ट्रोलिंगवर मी खूप विचार करायचे . खूप टेन्शन यायचं पण आता त्याकडे मी दुर्लक्ष करते.” तेजस्विनी लग्न करणार का? या प्रश्नावर ती म्हणते की, “मी पूर्ण सेटल्ड आहे, कोणाशीही लग्न करणं किंवा माझ्या आयुष्यात पुरुष असणं म्हणजे माझ्यासाठी ही सेटल्ड होण्याची उदाहरणं नाहीयेत. मी सेटल्ड आहे, खुश आहे, मी मजेत आहे, मी इंडस्ट्रीत काम करते आहे, मी माझा परिवार सांभाळते , मी बिजनेस संभाळतीये, निर्मिती संस्था चालवते, मी एकाचवेळी खूप गोष्टी करते. पुरुष असल्यानेच माझं आयुष्य पूर्णत्वास येईल असे मुळीच नाही त्यामुळे मी लग्नच करणार नाही हे ठरलेलं आहे.
पुढे तेजस्वीनी मराठी इंडस्ट्रीतिल गटबाजी बद्दल बोलताना म्हणते की, ” पण मी कुठल्याच गटात नव्हतेच कधी. लोक उगाचच म्हणतात की तू संजय जाधवच्या गटातली आहेस. खरं सांगायचं तर मी त्याच्यासोबत ‘ये रे ये रे पैसा आणि तू ही रे’ असे दोनच चित्रपट केले आहेत. पण तरीही लिकांनी मला त्या गटात टाकलं उलट माझ्यापेक्षा सईने त्याच्यासोबत जास्त काम केलं आहे. एखादा दिग्दर्शक वारंवार त्या अभिनेत्याला काम देत असेल तर त्याला त्याच्यासोबत काम करताना एक कम्फर्ट झोन बघत असतो. तो अभिनेता आपलं ऐकेल, त्यांचं बजेट व्यवस्थित बसत असेल त्याचीच तो निवड करत असतो. माझं नाव संजय जाधव सोबत जोडलं गेलं. पण मी खरं तर त्याला दादा म्हणते इथेच सगळं संपतं. मला उत्तर द्यायचीच गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे की, समोरचा व्यक्ती हा बाबारुपी किंवा दादारूपी आहे त्यामुळे तुम्हाला कोणाला उत्तरं द्यायची आहेत आणि का द्यायची आहेत.” असे म्हणत तिने या अफेअरच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.