serials

ही पूर्वी नक्की आहे तरी कोण? लक्ष्मी निवास मालिकेत होणार सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री

झी मराठी वरील लक्ष्मी निवास या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जयंत आणि जान्हवीच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. लक्ष्मी निवास यांच्या मुलाने स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय सुरू केला तर भावनालाही चांगल्या पगाराची नोकरी लागली. त्यात तिला सिधुचीही वेळोवेळी मदत मिळाली. अशातच आता मालिकेत आणखी एका पात्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे हे पात्र कोणता नवीन ट्विस्ट घेऊन येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे पात्र अभिनेत्री जान्हवी तांबट साकारणार आहे. जान्हवी तांबट हिने या मालिकेअगोदर सोनी मराठीच्या अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता लक्ष्मी निवास मालिकेत ती पूर्वीची भूमिका साकारताना दिसणार आहे. जान्हवी तांबट हिने २०२२ साली मिस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत तिने फर्स्ट रनरअपचा मान पटकावला. त्यानंतर घेतला वसा टाकू नको या झी मराठीच्या मालिकेत ती झळकली होती. संत गजानन शेगावीचे मालिकेतही ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता जान्हवी झी मराठीवर पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. यात तिची भूमिका नेमकी काय असणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

janhavi tambat in laxmi niwas serial
janhavi tambat in laxmi niwas serial

लक्ष्मी निवास या मालिकेला अगोदरच भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. त्यात पूर्वीची एन्ट्री कोणता नवा ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. मालिकेचे एकंदरीत कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. पण जयंतचे वागणे मात्र प्रेक्षकांना खटकले आहे. लेखकाने यावर विचार करायला हवा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे. तूर्तास अभिनेत्री जान्हवी तांबट हिला या नवीन मालिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button