news

मराठी मालिका अभिनेत्रीच नुकतंच झालं लग्न… बहीण देखील आहे प्रसिद्ध व्यक्ती

मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचं मोठ्या थाटात लग्न झालेलं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे सुखदा देशपांडे खांडकेकर. सुखदा खांडकेकर ही हिंदी नाट्य तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर ह्याची ती पत्नी होय. नुकतेच सुखदाची सख्खी धाकटी बहीण क्षमा देशपांडे हिचा विवाहसोहळा पार पडला आहे. अभिनेता आशिष चंद्रचूड सोबत तिने लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून क्षमा आणि आशिष च्या लग्नाची तयारी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी क्षमाने तिच्या मेंदी सोहळ्याचे खास फोटो शेअर केले होते. तर नुकतेच ते विवाहबद्ध झाले आहेत. या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

kashama deshpande wedding photos
kashama deshpande wedding photos

लग्नानिमित्त आपल्या या लाडक्या बहिणीसाठी सुखदाने अभिनंदन करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. क्षमा देशपांडे ही देखील अभिनेत्री म्हणून मराठी सृष्टीत काम करत आहे. शेमारु मराठी बाणा या वाहिनीवरील ‘ जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या मालिकेतून तिने एक्झिट घेतली होती. पायाची सर्जरी करायची असल्याने तिने जोगेश्वरीच्या भूमिकेला रामराम ठोकला होता. २०१९ मध्ये क्षमा देशपांडे हिने नाशिकची श्रावनक्वीन होण्याचा मान पटकावला होता. ३६ गुणी जोडी, शूर्पणखा, ती फुलराणी, बांबू, शाब्बास सुनबाई अशा चित्रपट तसेच मालिकेतून क्षमाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. क्षमा देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात येण्याचे ठरवले.

sukhada khandekar share sister kshama deshpande wedding news
sukhada khandekar share sister kshama deshpande wedding news

क्षमा लहान असल्यापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होत असे. डान्सची आवड असल्याने वेगवेगळ्या मंचावर तिने तिची कला सादर केली आहे. याशिवाय क्षमाने अनेक सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे. मॉडेलिंग, चित्रपट, मालिका असा तिचा प्रवास सुरु आहे. तर आशिष चंद्रचूड हा देखील मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेता आहे. हे दोघेही गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या या मैत्रीचे आता नात्यात रूपांतर झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button