news

अभिनेत्रीसोबत काम करताना जवळीक आली तर मी त्याच्या बाबतीत खूपच …सुबोध भावेबद्दल पत्नीचं वक्तव्य

येत्या ८ जुलै पासून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेत सुबोध भावे दुहेरी भूमिका साकारत आहे. AI च्या माध्यमातून प्रथमच हा प्रयोग मालिका सृष्टीत घडून येत असल्याने प्रेक्षकांनी मालिकेबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. दरम्यान मालिकेत सुबोधला AI या तंत्रज्ञानच्या माध्यमातून तरुण दाखवले आहे तेव्हा हा सुबोधचा मुलगा कान्हा आहे का असेही विचारण्यात येऊ लागले. या मालिकेनिमित्त सुबोध त्याची पत्नी मंजिरी सोबत एक मुलाखत देताना दिसला तेव्हा त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले की तो कान्हा नसून सुबोधच आहे.

subodh bhave with wife manjiri bhave
subodh bhave with wife manjiri bhave

या मुलाखतीत दोघांनी त्यांच्या प्रेमकहाणीला पुन्हा एकदा उजाळा दिलेला पाहायला मिळाला. सुबोध भावे आणि मंजिरी भावे हे दोघेही शाळेत आल्यापासूनचे मित्र. त्याचदरम्यान या दोघांचे प्रेम जुळून आले होते. मधल्या काळात मंजिरी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तेव्हा मोबाईल नसल्याने त्यांचे बोलणे होत नसे. अगदी पत्र जरी पाठवायची झाली तरी ती पत्र खूप दिवसांनी मिळायची. त्याकाळी एक फोन करण्यासाठी १०० रुपये मोजावे लागायचे असे सुबोध सांगतो. पण कालांतराने या दोघांची भेट घडून आली आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. आज सुबोधची पत्नी मंजिरी मराठी मालिका निर्मिती क्षेत्रात उरलेली पाहायला मिळते.

subodh bhave family photos
subodh bhave family photos

. या दोघांच्या लग्नाला जवळपास २३ वर्षे झाली आहेत पण तरीही ‘मी सुबोधच्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे’ असे मंजिरीचे म्हणणे आहे. याबद्दल ती म्हणते की, “सुबोधच्या बाबतीत फारशा काही चर्चा ऐकायला मिळत नाहीत. आज सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात पण सुबोधच्या बाबतीत तसं काही घडलं नाही. पण ज्या इंडस्ट्रीत तो काम करतो तिथे मात्र मला असुरक्षितता वाटते. मालिकेत चित्रपटात काम करताना अभिनेत्रीच्या जवळ जावं लागतं. त्यामुळे मला फार इनसिक्युअर वाटतं. याबाबद्दल माझ्यात आणि सुबोध मध्ये कित्येकदा वाद झालेले आहेत. त्यामुळे हो मी सुबोधच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह आहे.” असे मंजिरी या मुलाखतीत स्पष्टपणे सांगताना दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button