अनेक हिट भूमिका केल्यानंतर अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी कार…खरेदीवेळी खास मित्राने लावली हजेरी

खूप स्ट्रगल केल्यानंतर कामं मिळत गेली की आपल्या हक्काचं घर असावं आणि चार चाकी गाडी असावी हे त्या कलाकाराचं स्वप्न असतं. ही स्वप्न पूर्ण होतात हे गेल्या काही दिवसांत कित्येक कलाकारांनी अनुभवलं आहे. असाच काहीसा अनुभव आता अभिनेत्री अनिता दाते हिनेही घेतला आहे. चित्रपट, मालिका, नाटक अशा प्रवासात अनेक हिट भूमिकेतून तिला यशाचा एक एक टप्पा सर करता आला आहे . त्यामुळे आता आपल्याही हक्काची गाडी असावी हे स्वप्न तिने सत्यात उतरवलं आहे. काल अनिताने ह्युंदाई ब्रँडची Exter ही जवळपास १० लाख २८ हजार कींमतीची गाडी खरेदी केली आहे. ही गाडी खरेदी करताना अनिता सोबत तिचा खास मित्र उमेश जगतापने हजेरी लावली होती.

उमेश जगताप आणि अनिता दाते हे नाट्यशास्त्र विभागातून एकत्र जोडले गेले होते. दोघांच्या घट्ट मैत्रीचं नातं इथूनच तयार झालं होतं. उमेशला लग्नासाठी मुलगी शोधण्याचे कामही अनितानेच केले होते. त्यामुळे मैत्रिणीच्या या आनंदाच्या क्षणी देखील उमेशने खास हजेरी लावलेली पाहायला मिळाली . आपल्या हक्काची गाडी खरेदी करताना अनिता यावेळी खूप खुश होती. त्यामुळे सेलिब्रिटींनीदेखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
सुरुवातीच्या काळात अनिता दाते हिला सहाय्यक भूमिका मिळत होत्या. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने तिला प्रमुख नायिका म्हणून नवी ओळख मिळाली. ही मालिका बरेच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. पुढे चित्रपट, नाटक अशा माध्यमातून तिला अनेक दमदार भूमिका मिळत गेल्या. सध्या ती कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत आनंदीबाईची भूमिका साकारत आहे. हे पात्र विरोधी असल्याने अनिताला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मालिकेसोबतच अनिता नाटकातूनही सक्रिय असलेली पाहायला मिळते. ही तारेवरची कसरत करत असताना प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद तिला ऊर्जा देण्याचे काम करतो.