लक्ष्याला जाहीरपणे चिडलेलं कळवा आणि १००० रुपये मिळवा….नाटकावेळी विजय कदम यांनी जाहीर केली होती घोषणा

आज १० ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे कॅन्सरच्या गंभीर आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय कदम यांच्या पश्चात पत्नी पद्मजा आणि मुलगा गंधार असे त्यांचे कुटुंब आहे. मराठी सृष्टीत विजय कदम यांनी भरीव योगदान दिले होते. लक्ष्मीकांत बेर्डे सोबत त्यांची खास मैत्री जुळली होती. त्यांच्या आठवणींचा एक खास किस्सा इथे जाणून घेऊयात. १९७८ पासून लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची खास मैत्री होती. दे दणादण, आम्ही दोघे राजाराणी, सारेच सज्जन, मामला पोरींचा, दे धडक बेधडक अशा चित्रपटातून त्यांनी एकत्रित काम केले होते.

१९७८ साली त्यांची ओळख एका नाटकातून झाली होती. रत्नाकर मतकरी लिखित चि सौ कां चंपा गोवेकर यावर आधारित नाटकात त्यांनी एकत्रित काम केलं होतं. या नाटकाचे दिग्दर्शन विहंग नायक यांनी केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या नाटकात अनेक विनोदी कलाकार आणले होते. त्यात विजय कदम देखील होते. लक्ष्मीकांतला पाहून विजय कदम या नाटकावेळी म्हणाले होते की, “लक्ष्याला जाहीरपणे चिडलेलं कळवा आणि हजार रुपये मिळवा”. यामागचे कारण सांगताना ते म्हणताले होते की, “कलावंत हा, एक कलावंत आणि माणूस म्हणून जेव्हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांमध्ये, कुटुंबामध्ये छोट्या मोठ्यांपासून सगळ्यांमध्ये रमतो आणि म्हणूनच तो सगळ्यांना आवडतो.” हि एक युक्ती होती त्यावेळी लक्षाच नाव जरी दिसलं तरी नाटकाला प्रचंड गर्दी व्हायची..

पण जेव्हा १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्या गेल्याची बातमी त्यांना कळली तेव्हा ते ओक्साबोक्शी रडले होते. ” १६ डिसेंबर मी विसरू शकत नाही. पहाटे पावणे चार वाजता घरातला फोन खणखणला तो फोन उचलला तेव्हा लक्ष्मीकांतचे मोठे भाऊ आमच्या दादांनी लक्ष्याच्या निधनाची बातमी सांगितली. त्यानंतर पुढचे दोन तास ही बातमी अख्ख्या महाराष्ट्राला मी कळवत होतो. कारण ती बातमी सगळ्यांपर्यंत जाणं गरजेचं होतं. पण एक मात्र होतं की ही बातमी सांगत असताना माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.” असे म्हणत असताना विजय कदम डोळ्यातले अश्रू लपवू शकत नव्हते.