काहीच दिवसांपूर्वी नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जनता दरबारमध्ये न्याय मागण्यासाठी आलेल्या मनोरंजन क्षेत्रातील दोन महिलांना आज नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिले आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे. मधू आणि हिना असे या दोन महिलांची नावे आहेत. काहीच दिवसांपूर्वी या दोन्ही महिला नितीन नांदगावकर यांच्याकडे तक्रार घेऊन आल्या होत्या. नितीन नांदगावकर हे जनता दरबारात अनेक गरजुना मदत करतात म्हणून या दोघीही तिथे आल्या होत्या. झी 5 साठी काली नावाची वेबसिरीज बनवण्यात आली होती. त्यात या दोघीनी असिस्टंट डायरेक्टर आणि रिपोर्टर म्हणून काम केले होते.
फेब्रुवारी महिन्यात ही वेबसिरीज पूर्ण झाली पण पाच महिने होऊनही हिनाला तिच्या कामाचे ५५ हजार रुपये आणि मधूचे ५ हजार रुपये निर्मात्याने थकवले होते. हे पैसे मिळावेत यासाठी दोघीही नितीन नांदगावकर यांच्याकडे आल्या. त्याचवेळी नितीन नांदगावकर यांनी वेबसिरीजचे दिग्दर्शक योगेश म्हापणकर यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि महिलांच्या कामाचे पैसे का अडवले म्हणून समाचार घेतला. त्यांचे पैसे द्या अन्यथा वेबसिरीज रिलीज होऊ देणार नाही असा धमकी वजा इशारा नितीन नांदगावकर यांनी योगेश आणि निर्मात्याला दिला होता. त्यानंतर आता जवळपास सहा दिवसातच त्या दोन्ही कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले असल्याचे माहिती नितीन नांदगावकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
मधू आणि हिना सोबतचा एक फ़ोटो शेअफ करताना नितीन नांदगावकर म्हणतात की “मधु आणि हिनाला न्याय मिळवून दिला …. ZEE 5 साठी वेबसिरीज बनवली शूटिंग पूर्ण होऊन 6 महिने झाले तरी हिना आणि मधू आणि बऱ्याच पडद्यामागच्या स्टाफला त्यांचे पैसे मिळाले नव्हते. फक्त एक फ़ोन करुन विनंती केली आणि सहा दिवसात पैसे मिळाले ह्याचा आनंद मधु आणि हिनाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला !”