news

धक्कादायक! झुमकावाली पोर फेम अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ..अभिनेत्रीला कोसळले रडू

कला क्षेत्रात प्रेक्षकांना तसेच चाहत्यांना हादरवणाऱ्या अनेक बातम्या पहायला मिळत असतात. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री तसेच मॉडेल असणाऱ्या पूनम पांडे हिच्या अचानकपणे मृत्यूच्या बातमीने देशभरात खळबळ माजली होती. पण सर्व्हाईकल कॅन्सरची जागरूकता पसरावी या उद्देशाने तिच्या मृत्यूची अफवा बनवण्यात आली हे नंतर जाहीर करण्यात आले. पण याच जोडीला कलाकारांबद्दल अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जातात. नुकतेच खान्देशची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री राणी कुमावत हिच्याही मृत्यूच्या बातमीने खान्देशात एकच खळबळ उडाली आहे. राणी कुमावत हिचा मृतावस्थेत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने तिचा मृत्यू झाला अशी एक अफवा पसरवण्यात आली आहे.

स्वतःच्याच या मृत्यूच्या बातमीने मात्र राणी कुमावत हीची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे चाहते तिला फोनवरून संवाद साधत आहेत. ती सुखरूप असल्याची खात्री करत आहेत. काहींनी तर रडत रडतच तिच्या सुखरूपतेची चौकशी सुरू केली आहे. अर्थात राणी कुमावत हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यामुळे तिच्या मृत्यूची बातमी पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. पण ही बातमी पाहून स्वतः राणी कुमावत हिने चाहत्यांशी संवाद साधला आहे. अर्थात ही बातमी पाहून मीच हादरले असल्याची एक धक्कादायक प्रतिक्रिया तिने दिली आहे. हा धक्काच मला सहन होत नाही आणि माझ्याकडे यासाठी काही शब्दच नाहीत असे भावूक होत ती चाहत्यांना मी जिवंत असल्याचे सांगत आहे.

rani kumawat zumka wali por news
rani kumawat zumka wali por news

राणी कुमावत हिने काही दिवसांपूर्वी तिच्या एका आगामी गाण्याचे शूटिंग केले होते त्यातला हा फोटो कोणीतरी व्हायरल केला असे ती या फोटोमागचे कारण सांगते. हे शूटिंग होत असताना कोणी फोटो काढू नये याची त्यावेळी काळजी घेण्यात आली होती. मात्र शूटिंग बघायला जमलेल्या गर्दीतून विक्षिप्त मानसिकतेच्या एका व्यक्तीने हा फोटो मुद्दामहून सोशल मीडियावर टाकला असल्याचे ती सांगते. बातमीवर विश्वास ठेवू नये आणि संबंधित व्यक्तीचा तपास सुरू आहे असेही तिने आवाहन केले आहे. दरम्यान अशा मानसिकतेला काय म्हणावं असा प्रश्न इथे उपस्थित करण्यात येत आहे. कारण राणी कुमावत ही अगोदर तिचाच सहकलाकार आणि प्रसिद्ध खान्देश स्टार असलेल्या विनोद कुमावत सोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांचं ‘झुमका वाली पोर ‘ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. कालांतराने या दोघांमध्ये खाजगी वाद झाले होते तेव्हापासून राणी कुमावत डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतरही ती स्वतःला सावरण्यासाठी बरेच प्रयत्न करू लागली. त्यात आता स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहून ती अजूनच खचून गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button