“अश्विनी ये ना” गाण्यातील अभिनेत्रीची मुलगीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री… एक मुलगी एअरहोस्टेस तर दुसरी अभिनेत्री
अश्विनी ये ना…हे गाणं आजही रसिक प्रेक्षकांना मोहिनी घालणारं ठरलं आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं म्हणूनही या गाण्याला एक वेगळी ओळख मिळालेली आहे. १९८७ सालच्या गंमत जंमत या चित्रपटाने काही लोकप्रिय गाणी दिली त्यातलच हे एक गाणं. अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. ही अश्विनी म्हणजेच चारुशीला साबळे पुढे जाऊन अनेक चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिकेत झळकल्या. शाहीर साबळे यांच्या या लेकीने मराठी सृष्टीतच नाही तर अगदी हिंदी चित्रपटातूनही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच त्या स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या.
हिंदी चित्रपट सृष्टीत काम करत असताना अभिनेते अजित वाच्छानी यांच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. अजित वाच्छानी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत एक वेगळं नाव कमावलं आहे. बॉलिवूडचा खलनायक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. पण २००३ साली वायच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्रिशाला आणि योहाना ही त्यांची दोन अपत्ये आहेत. त्रिशाला एअरहोस्टेस असून आता ती तिच्या घर संसारात रमली आहे. पण आईवडिलांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी योहाना हिने पुढे चालवलेला आहे. योहाना ही हिंदी, गुजराथी तसेच मराठी चित्रपट, नाट्य अभिनेत्री आहे. अनेक गुजराथी नाटकांमध्ये योहानाने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटात युहाना झळकली आहे. यात तिने तिच्या आईची म्हणजेच चारुशीला साबळे यांचीच व्यक्तिरेखा साकारली होती. अजूनही चांदरात आहे ही तिने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका ठरली होती. तर २००६ सालच्या जबरदस्त या मराठी चित्रपटात ती मोनिकाची भूमिका साकारताना दिसली. केवळ अभिनेत्रीच नाही तर योहानाने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलेले आहे. अनेक परदेशी चित्रपट, जाहिरातींसाठी तिने डबिंग आर्टिस्टचे काम केले आहे.