मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच पुण्यातील आलिशान घर आतून आहे खूपच सुंदर .. ४ bhk घराची किंमत ऐकून व्हाल अवाक
भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सध्या चेन्नई सुपरकिंग आयपीएल संघाचा कर्णधार आहे. सध्या आपीएलचे सामने सुरु आहेत आणि प्रथमच भारतीय पूर्व कर्णधार महेंद्रसिग धोनी याने आयपीएल मधील चेन्नई सुपरकिंगच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्यावर सोपवली आहे. ऋतुराजने कमी वयातच चांगली कामगिरी केल्यामुळे आज तो हे सुवर्णक्षण अनुभवताना पाहायला मिळत आहे. मागील वर्षी आयपीएल सामन्यानंतर त्याने महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाज उत्कर्षा पवार हिच्या सोबत लग्नगाठ बांधली. सुरवातीला पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात राहणारा ऋतुराज आता पुण्यातील पाषाण मधील सोमेश्वरवाडी या भागात अमर लँडमार्क येथे राहत आहे.
ऋतुराजने गेल्या वर्षी अमर लँडमार्क मध्ये ४ बेडरूमचा फ्लॅट घेतला सध्या तेथे त्याच कुटुंब वास्तव्यास आहे. ह्या फ्लॅटची किंमत तब्बल ८ कोटी रुपये इतकी आहे. फ्लॅट सोबत साजेस फर्निचर आणि इंटेरिअर बिल्डरकडूनच देण्यात आलं आहे. तेथे जिम, चिल्ड्रेन प्ले एरिया, ओपन गार्डन, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक अश्या अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. तर बल्डिंगच्या वर भलंमोठा पार्टी एरिया असलेला पाहायला मिळतो. पाषाण हा पुण्यातील सर्वात वेगाने डेव्हलप झालेला एरिया म्हणून ओळखला जातो विशेष करून आयटी हब जवळ असल्याने पाषाण भागातील जमिनीच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेल्या पाहायला मिळतात. ऋतुराज आणि त्याची पत्नी सोशल मीडियावर घरातील आनंदी क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळतात.
ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड हे डिफेन्स रिसर्च डेव्हलोपमेंट ऑर्गनिझशन(DRDO) मध्ये काम करत होते आता ते रिटायर झाले आहेत. तर ऋतुराजची आई स्वाती गायकवाड ह्या चिंचवडच्या नगरपालिका शाळेमध्ये शिक्षिका होत्या. सेंट जोसेफ इंग्लिश मेडीयम आणि लक्ष्मीबाई नाडगुडे शाळेतून ऋतुराज शिकला आहे. ऋतुराजच्या जन्मापासूनच ते पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात राहत होते पण आता ऋतुराजने हे आलिशान घर घेतल्यापासून ते वर्षभरापासून सहकुटुंब पाषाण भागात वास्तव्यास आहेत. अनेकांना हे माहित नसेल कि ऋतुराज अस्सल पुणेरीच आहे पुण्यातील सासवड भागातील पारगाव मेमाणे हे ऋतुराजच गाव आहे.