news

मराठी अभिनेत्रीला फिल्मी स्टाईलने प्रपोज…हा क्षण अनुभवण्यासाठी सख्खी बहीण सुखदा खांडकेकरनेही लावली हजेरी

मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या बॉयफ्रेंडने फिल्मीस्टाईलने प्रपोज केलेले पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे क्षमा देशपांडे. क्षमा देशपांडे हिने मराठी सृष्टीत सहाय्यक ते प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. गेल्याच महिन्यात शेमारु मराठी बाणा या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘ जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या मालिकेतून एक्झिट घेतली होती. पायाची सर्जरी करायची असल्याने तिने जोगेश्वरीच्या प्रमुख भूमिकेला रामराम ठोकला होता. २०१९ मध्ये क्षमा देशपांडे हिने नाशिकची श्रावनक्वीन होण्याचा मान पटकावला होता.

३६ गुणी जोडी, शूर्पणखा, ती फुलराणी, बांबू, शाब्बास सुनबाई अशा चित्रपट तसेच मालिकेतून क्षमाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. क्षमा देशपांडे ही अभिनेत्री सुखदा देशपांडे खांडकेकर हिची सख्खी बहीण आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत क्षमा ने देखील आता अभिनय क्षेत्रात चांगला जम बसवलेला आहे. क्षमा लहान असल्यापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होत असे. डान्सची आवड असल्याने वेगवेगळ्या मंचावर तिने तिची कला सादर केली आहे. याशिवाय क्षमाने अनेक सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे. मॉडेलिंग, चित्रपट, मालिका असा तिचा प्रवास सुरु आहे.

sukhada khandekekar sister kshama deshpande
sukhada khandekekar sister kshama deshpande

आज क्षमा ने तिच्या बॉयफ्रेंडचे प्रपोज स्वीकारतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खरं तर क्षमा ने डिसेंबर महिन्यातच बॉयफ्रेंडच्या प्रपोजचा प्रस्ताव स्वीकारला होता पण ही प्रोसेस नेमकी कशी होती याचा व्हीडिओ तिने काही वेळापूर्वी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यामुळे क्षमा आता लग्न कधी करतेय असे प्रश्न तिला विचारण्यात येऊ लागले आहेत . दरम्यान सुखदा खांडकेकर आणि इतर बहीण भावंड देखील या क्षणाचे साक्षीदार आहेत. तर क्षमाला प्रपोज करणारा आशिष चंद्रचूड हा देखील अभिनेता आहे. आशिष चंद्रचूड याने सन मराठी वरील माझी माणसं या मालिकेत भूमिका साकारली आहे.

Kshama Manali Manoj Deshpande in jogeshvaricha pati bhairavnath serial
Kshama Manali Manoj Deshpande in jogeshvaricha pati bhairavnath serial

ergerthrthty

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button