news

राज ठाकरे यांनी अजूनही माझ्यासाठी ते केल नाही….झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ वेळी अमित ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

सध्या झी युवा वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. युवावर्ग हा समाजाचे भविष्य आहे असे नुसते बोलून नव्हे तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांना शोधून त्यांच्या शिरपेचात झी युवा सन्मान पुरस्काराचा तुरा रोवण्याचा ध्यास झी युवा वाहिनीने घेतला आहे. यावर्षी विविध क्षेत्रांतील प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा कर्तबगार तरूणांच्या यादीत श्री अमित राज ठाकरे यांनी यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कारावर नाव कोरले आहे, रविवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ हा सोहळा प्रसारीत होणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे या सोहळ्याला सहकार्य मिळाले आहे.

zee yuva 2024 sanman amit thackrey
zee yuva 2024 sanman amit thackrey

झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केले…. आणि या वक्तव्यात त्यांनी राज ठाकरे यांनी अजूनही त्यांच्यासाठी काय केले नाही याची खंत व्यक्त केली. अर्थात अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क निर्माण झाले आहेत. अमित ठाकरे यांचे वक्तव्य – “माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं.” “मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळण्याची इच्छा आहे.कदाचित मी अजुन म्हणावे तसे काही केले नसेल मात्र मी त्या दिवसाची वाट पाहीन .

raj thackrey son amit thackrey news
raj thackrey son amit thackrey news

अमित ठाकरे यांची कार्य – मनसेच्या विद्यार्थीसेनेच्या अध्यक्षपदापासून अमित ठाकरे यांच्या कामाचा प्रवास सुरू झाला. आजपर्यंत, अमित यांनी समाजातील अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान केले. राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या अमित ठाकरे यांनी समाजातील तळागाळातील लोकांया व्यथा समजून घेत कामाचा निपटारा करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला असलेलं वलय अमित ठाकरे यांना वारसाने मिळाले असले तरी, आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने अमित ठाकरे यांनी युवानेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे नेते अशी त्यांच्या कामाची छाप आहे. विद्यार्थीसेनेच्या माध्यमातून युवकांच्या अनेक समस्यांची उकल करण्यात अमित ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा, रेल्वेप्रवाशांच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांशी पाठपुरावा या कामात अमित ठाकरे यांनी त्यांचे नेतृत्वकौशल्य दाखवले आहे. नेता हा लोकांना आपला वाटला पाहिजे हा मंत्र जपून अमित ठाकरे यांनी राजकारण आणि समाजकारण यांच्यात समन्वय साधला. अमित ठाकरे यांनी याच नेतृत्वगुणाची दखल घेत झी युवा वाहिनीतर्फे त्यांना झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.रविवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ हा सोहळा प्रसारीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button