news

मी कधीच कोणाबद्दल वाईट पोस्ट करत नाही पण या अनुभवामुळे माझ्याकडे दुसरा पर्यायच….स्वप्नील जोशीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल

मराठी सृष्टीतील चॉकलेट हिरो अशी इमेज असलेल्या स्वप्नील जोशीच्या पत्नीला आज एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. मी कधीच कोणाबद्दल काही वाईट लिहीत नाही किंवा नकारात्मक गोष्टी पोस्ट करत नाही पण माझ्याकडे आज काहीच पर्याय शिल्लक नव्हता अशी एक सुरुवात तिने पोस्टमध्ये केली आहे. स्वप्नील जोशीची पत्नी लिना या आज बोरिवली येथील पैंटालून फॅशन शोरूम मध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. पण तिथल्या शॉपिंगचा त्यांना खूप मोठा वाईट अनुभव आला. शॉपिंग केल्यानंतर लिना बिलिंग काऊंटरकडे गेल्या. त्यांच्या कार्डमधून ऑनलाइन पैसेही देण्यात आले. पण त्यांच्या सिस्टीममध्ये ते जमा झालेले पैसे दाखवले जात नसल्याने २ तासापेक्षा जास्त वेळ त्यांना बिलिंग काऊंटरवर थांबावे लागले. काऊंटरवर असलेल्या स्टाफच्या अज्ञानामुळे लिना जोशी यांना हा नाहक त्रास सहन करावा लागला.

swapnil joshi with wife leena joshi
swapnil joshi with wife leena joshi

दरम्यान पैंटालून शोरूमचा हा वाईट अनुभव पाहून त्यांनी इथे कधीच खरेदी करू नका असाही सल्ला दिला आहे. “साधारणपणे मी कधीच काही नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. पण या अनुभवामुळे माझ्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. बोरिवलीच्या पैंटालून शोरूमचा सगळ्यात वाईट अनुभव मी आज घेतला आहे. गेल्या २ तासाहून अधिक वेळ मी बिलिंग काऊंटरवर आहे. माझ्या कार्ड मधून पैसे डेबिट झाल्याचे दाखवतात पण त्यांच्या सिस्टीममध्ये ते दाखवलं जात नाही. यावर काय करावं याबद्दल इथला स्टाफ पूर्णपणे अज्ञानात आहे “असे म्हणत लिना यांनी पैंटालून फॅशन ब्रँडला धारेवर धरत ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नाही इथे कधीच खरेदी करू नका’. असा सल्ला त्यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे.

swapnil joshi wife leena pantaloon shop
swapnil joshi wife leena pantaloon shop

लिना जोशी या पेशाने डेंटिस्ट आहेत. दोन मुलं, सासू सासरे अशी घरची जबाबदारी सांभाळत त्या आपला संसार सुखाचा करत आहेत. कला सृष्टीपासून त्या चार हात लांब असल्या तरी स्वप्नील जोशीला त्या वेळोवेळी पाठिंबा देण्याचे काम करतात. या रिअल लाईफ जोडीला अनेकदा कार्यक्रमातून एकत्रित पाहिले गेले त्यावेळी त्या किती समजूतदार आणि शांत स्वभावाच्या आहेत याची प्रचिती येते. त्याचमुळे लिना यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button