news

रस्त्यावर राहायची वेळ अनेक कोर्ट कचेऱ्या आता.… रेमंड कंपनीच्या मालकाच्या आयुष्यात तब्बल ७ वर्षानी आला आनंदाचा क्षण

रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया आणि त्याचे वडील विजयपत सिंघानिया हे आता २०१७ नंतर म्हणजेच जवळपास ७ वर्षाने पुन्हा एकत्र आले आहेत. विजयपत सिंघानिया हे पुन्हा घरी परतले असल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. गौतमने काही दिवसांपूर्वीच पत्नी नवाझ मोदींपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आता गौतमच्या वागण्यात कमालीचा बदल घडून आला असून त्याने त्याच्या वडिलांना पुन्हा घरी परत आणले आहे. गौतम सिंघानियाने आज बुधवारी त्याच्या घरी वडिलांचे स्वागत करणारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून सगळीकडे या गोष्टीचा आनंद साजरा केला जात आहे. एका छोट्या कापड कंपनीतून रेमंडला जगप्रसिद्ध ब्रँडमध्ये रूपांतरित करणाचे काम विजयपत सिंघानीया यांनी केले होते. पण त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी या कंपनीचे हक्क गौतमकडे सोपवले होते.

vijaypath singhania photo
vijaypath singhania photo

त्यानंतर विजयपत यांना गौतमने घरातून हाकलून देऊन रस्त्यावर आणले होते. आपल्या मुलाला सर्वकाही देण्याची ‘मूर्ख’ चूक मी केली अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती. आपल्या मुलांना सर्वकाही देण्याआधी काळजीपूर्वक विचार करा.असाही सल्ला त्यांनी पालकांना दिला होता. २०१७ मध्ये, विजयपत हातच सगळं गमावून बसले तेव्हा गौतमने दक्षिण मुंबईतील त्यांच्या कौटुंबिक मालमत्तेतील जेके हाऊसमधून बाहेर काढले होते. यासंदर्भात त्यांनी कोर्टाकडे धाव घेतली होती. गौतम आणि नवाज मोदी यांच्या भांडणात त्यांनी सुनेची बाजू घेतली होती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयात मी हस्तक्षेप करू इच्छित नाही. पण आपल्या सुनेच्या पाठीशी मी उभा आहे, मुलाच्या नव्हे असे त्यांनी स्पष्ट केले होते. एकाकी जीवन जगताना विजयपत यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण मुलगा गौतमने त्यांच्याकडून सर्व काही काढून घेतले होते आणि ते त्यांच्याकडे उरलेल्या थोड्या पैशांवर जीवन व्यतीत करत होते .“माझ्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही.

vijaypath singhania with wife
vijaypath singhania with wife

त्याने मला कंपनीचे काही भाग देण्याचे मान्य केले होते. पण अर्थातच, तो ते करणार नाही. मी त्याला सर्व काही देऊन बसलो. चुकून माझ्याकडे काही पैसे शिल्लक राहिले ज्यावर मी आज जीवन जगत आहे. नाहीतर मी रस्त्यावर आलो असतो. मला रस्त्यावर पाहून त्याला आनंद होईल मला याची खात्री आहे. जर तो आपल्या बायकोला असे घरा बाहेर काढून देऊ शकतो, तर तो त्याच्या वडिलांसोबतही असे वागू शकतो. असे त्यांनी म्हटले होते. पण आज सोशल मीडियावर गौतमने वडिलांना घरी परत आणल्याची आनंदाची बातमी शेअर करून एक वेगळाच आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button