news

भाड्याने लक्झरी कार दुबईत घर नाही…अटकेनंतर आईवडिलांनीच केली बिग बॉस विजेत्याची पोलखोल

प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादवच्या अटकेमुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. एल्विश यादव या लोकप्रिय सोशल मीडिया स्टारला रविवारी सापाच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली. याप्रकरणी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर एल्विशच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पूर्णपणे खचलेली दिसत आहे. माझ्या मुलाने काहीही चुकीचे केले नाही याचा सतत उल्लेख करत आहे. या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अलीने गोनी याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. एल्विश यादवला अटक केल्यानंतर नोएडा पोलिस अधिकाऱ्याने मीडियाशी संवाद साधला आणि सांगितले की एल्विशने चौकशीदरम्यान मला कशाचीही भीती वाटत नाही असे म्हटले आहे.

elvish yadav family photo
elvish yadav family photo

पोलिसांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, “चौकशीदरम्यान एल्विशने त्याचा गुन्हा स्वीकारला नाही, परंतु आमच्याकडे बरेच पुरावे आहेत” असे म्हटले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, त्याच्या आईवडिलांनी या दाव्यांचे खंडन केले आहे. आमचा मुलगा निर्दोष आहे असेच ते सांगत आहेत. शिवाय एल्विश व्हिडिओंमध्ये मर्सिडीज आणि पोर्श सारख्या स्पोर्ट्स कारसारख्या आलिशान मालमत्तेचा दिखावा करत असल्याच्या दाव्यादरम्यान, त्याच्या पालकांनी स्पष्ट केले की त्याच्याकडे अशी कोणतीही लक्झरी गाड्या नाहीत. त्यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले की एल्विशकडे फक्त टोयोटा फॉर्च्युनर आणि एक वॅगन-आर आहे आणि त्या दोन्ही गाड्या कर्जावर आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितले की एल्विश त्याच्या व्हिडिओ शूटसाठी मित्रांकडून लक्झरी कार भाड्याने घेतो आणि नंतर त्या परत करतो.दरम्यान एल्विश यादव युट्युब आणि जाहिरातींमधून कोट्यवधींची कमाई करतो असे म्हटले जात आहे. दुबईत त्याने ८ कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली असे त्याने म्हटले होते पण दुबईत अशी त्याची कुठेच प्रॉपर्टी नाही हे स्पष्टीकरण त्याच्या पालकांनी दिले आहे.

elvish yadav youtuber cars
elvish yadav youtuber cars

दरम्यान एका प्लॉटच्या बदल्यात त्यांना एक मोठा फ्लॅट मिळाला असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. या दाव्याला मान्यता देताना, एल्विशच्या पालकांनी आरोप केला की त्याला एका एनजीओकडून फसवले जात आहे. या घटनेबाबत भाजप खासदार आणि पीएफए ​​अध्यक्षा मनेका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पीपल फॉर ॲनिमल्स (PFA) ने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर सापांच्या गैरवापराचा नोएडाच्या सेक्टर ५१ मधील पार्टीत सापाचे विष मिळवण्यात एल्विशचा सहभाग असल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. त्यानंतरच्या तपासात घटनास्थळावरून जप्त केलेल्या नमुन्यांद्वारे कोब्रा आणि क्रेट सापाच्या विषाचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता एल्विश यादवच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button