news

त्या सीनमुळे पारू मालिकेवर भडकले प्रेक्षक…मालिका बंद करण्याची मागणी

झी मराठी वाहिनीवर पारू ही नवीन मालिका दाखल झाली आहे. १२ फेब्रुवारी रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. अहिल्यादेवी आणि तिचा दरारा या मालिकेत पाहायला मिळाला. त्याच जोडीला नायकाचा डॅशिंग अंदाज आणि पारूचा अवखळपणा मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण अवखळ आणि अल्लड पारूला दरवेळी कानाखाली मिळते हे पाहून प्रेक्षकांनी ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. पारू ही गावाकडे वाढलेली मुलगी. तिचे वडील किर्लोस्कर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत असतात. पारू गावाकडुन गणी आणि एका करडूला सोबत घेऊन आलेली असते. किर्लोस्कर बंगल्यात येताच तिच्या अवखळपणाचा अहिल्यादेवीला खूप राग येतो. पारूमुळे साडी फाटली म्हणून पारूला पहिली कानाखाली बसते.. त्यानंतर आता मालिकेत अहिल्यादेवीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होत आहे.

paru marathi serial
paru marathi serial

लग्नाचा २५ वा वाढदिवस म्हणून तो मोठ्या थाटात केला जात आहे. अशातच अहिल्यादेवीची साडी दिव्याने पेट घेऊ नये म्हणून पारू धावत जाते. त्यात सगळा उडालेला गोंधळ बघून नायक चक्क पारुच्या कानाखाली वाजवताना दाखवला आहे. या मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. नायक नायिकेच्या कानाखाली वाजवतो हे पाहून प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. नायिकेच्या सतत काय कानाखाली वाजवता? अशी तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. मालिकेची नायिका ही अल्लड आहे पण तिच्या सतत कानाखाली वाजवताना दाखवणे चुकीचे आहे. यामुळे नायिकेच्या आत्मसन्मानावर गदा येत आहे. नायिका अशी अल्लड कशी काय दाखवली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आवाज मोठ्याने करून बोलणे, स्वतःच्याच धुंतीत वावरणे, स्वतःची मनमानी करणे या गोष्टींचा अतिरेक करण्यात आला आहे.

मुळात म्हणजे आजच्या घडीला अशा नायिका कुठेच नसतात. आणि कितीही अशिक्षित असल्या तरीही कुठे कसं राहावं आणि कसं वागावं याची समज असते. त्यामुळे हा अल्लडपणा आणि अवखळपणा मालिकेतून दाखवणे बंद करायला हवे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याकडे प्रेक्षक पाठ फिरवत असतात. मालिकेत चांगल्या गोष्टी दाखवल्या जाव्यात आधीच प्रेक्षकांची माफक अपेक्षा असते. मालिकेची भव्यदिव्यता दाखवण्यात दिग्दर्शक आणि निर्माता दोघेही यशस्वी ठरले आहेत. शिवाय शरयू सोनवणे, प्रसाद जवादे सारखे हरहुन्नरी कलाकार त्यांच्या परीने उत्तम अभिनय निभावत आहेत. पण असे सतत कानाखाली वाजवणे थांबवले पाहिजे अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button