news

जुना फोटो दिसला आणि एकटाच हसलो… ५ पिढ्या शिंदे घराणेशाहीने गायनाचा वारसा जपणाऱ्या

पाच पिढ्या शिंदे घराणेशाहीने गायनाचा वारसा जपलेला आहे. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि आता त्यांची मुलं देखील गायन क्षेत्रात नाव लौकिक करत आहेत. शिंदे कुटुंब भीमगितांसाठी विशेष ओळखलं जातं. पण त्यानंतर आदर्श शिंदे यांनी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक म्हणून स्वतःची ओळख मिरवली. देवा तुझ्या गाभाऱ्याला, हळद लागली, अंबे कृपा करी, शंकरा रे शंकरा, नाद करा अशा विविध धाटणीची ठसकेबाज गाणी गाऊन त्यांनी मराठीसह हिंदी सृष्टीतही लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तेथे आदर्श शिंदे यांनी त्यांच्या नावाने पेट्रोल पंप सुरू केला होता. तेव्हा शिंदे कुटुंबाची व्यवसायाकडे झालेली वाटचाल पाहून त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते.

adarsh shinde with brothers
adarsh shinde with brothers

पण आज आदर्श शिंदे यांनी चक्क ज्यूस सेंटर सुरू केला असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्यावर क्रांती रेडकर हिच्यासह अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. खरं तर आदर्श शिंदे यांचा मिश्किल अंदाज या फोटोतून चाहत्यांना पाहायला मिळाला. हा फोटो खूप जुना असल्याचे आदर्श शिंदे यांनी अधोरेखित केले आहे. आणि या फोटो मागची खरी गंमत सांगताना त्यांना स्वतःलाच हे हसू आवरत नव्हते. जुना फोटो पाहताक्षणी आदर्श शिंदे एकटेच हसू लागले. तेव्हा त्यांनी हा फोटो चाहत्यांसोबत शेअर करण्याचे ठरवले. फोटोबद्दल ते सांगतात की, ” नवीन bussiness सुरु केला आहे असं समजू नका ! खूप जुना फोटो आहे हा, महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्या नावाचा हा juice सेंटर दिसला.

adarsh shinde in adarsh juice centre
adarsh shinde in adarsh juice centre

मग काय juice तर घ्यायलाच हवा आणि फोटो पण, तर आठवण म्हणून हा फोटो काढला होता. आता gallery scroll करत असताना हा फोटो दिसला आणि एकटाच हसलो, तर म्हटलं ही गोड आठवण तुम्हासोबत पण share करुया.सर्व आदर्श lemon juice centre ला माझा जाहीर पाठिंबा ” आदर्श शिंदे यांच्या या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “चला आता बरं झालं..करिअरचं टेन्शन नाही”…अशी क्रांती रेडकरने मजेशीर कमेंट केली आहे. एका युजरला तर फोटो पाहून खरंच त्यांनी हा व्यवसाय केला होता का अशी शंका मनात आली पण फोटोखालचे कॅप्शन वाचल्यानंतर त्याचा उलगडा त्यांना झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button