श्रेयसच्या छातीत ब्लॉक आढळल्याने हृदविकाराचा झटका येण्यागोदरच केली अँजिओप्लास्टी… सिनेमातील ऍक्शन सिन असणारे स्टंट करून
मराठी कलाविश्वाला हादरवणारी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर काल गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयस तळपदे याची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. श्रेयस तळपदे हा काल गुरुवारी दिवसभर “वेलकम टू जंगल” या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. यात त्याने काही ऍक्शन सिन असणारे स्टंट देखील केले होते. दिवसभर त्याची प्रकृती उत्तम होती पण रात्री घरी परतल्यानंतर त्याला अस्वस्थ जाणवू लागले.
श्रेयसची तब्येत नाजूक असल्याचे लक्षात येताच पत्नी दिप्तीने त्याला ताबडतोब अंधेरी येथील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान वाटेतच श्रेयसला चक्कर देखील आली होती. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना श्रेयसच्या छातीत ब्लॉक असल्याचे आढळले. हृदविकाराचा झटका येण्यागोदरच डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. रात्री दहा वाजता त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे तात्पुरता धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान अँजिओप्लास्टीनंतर श्रेयसच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. प्रकृती स्थिर असल्याने त्याला आज किंवा उद्या डिस्चार्ज देण्यात येईल असे सांगितले आहे. दरम्यान ही बातमी कळताच मराठी सेलिब्रिटींनी श्रेयसच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे. तर अनेकांना वैयक्तिक भेट घेऊन त्याच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आहे.
वेलकम टू जंगल हा श्रेयसचा आगामी चित्रपट आहे. या मल्टी स्टारर चित्रपटात रविना टंडन, अक्षय कुमार, संजय दत्त, दिशा पाटणी, अर्षद वारसी, लारा दत्ता, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, राहुल देव, सुनील शेट्टी, परेश रावल , श्रेयस तळपदे यासारखे कलाकार झळकणार आहेत. कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा, ऍक्शन सीन्सने व्यापलेला हा चित्रपट असणार आहे. श्रेयस तळपदे या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेव्हा ही मल्टिस्टारर मुव्ही पाहून अनेकांनी या चित्रपटाचे स्वागत केले होते. दरम्यान श्रेयस तळपदे प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवस शूटिंगपासून लांब राहणार आहे. त्यानंतर तो या चित्रपटाच्या शूटिंगला हजर राहील असे सांगितले आहे.