news

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अभिनेत्याची लगीनघाई…लग्नाच्या हळदीचा सजला थाट

स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कला आणि अद्वैत ची लव्हस्टोरी सुरू होण्यागोदरच हा अद्वैत चांदेकर आता नयनाच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळतो आहे. नयनाचे कटकारस्थान अद्वैतला कधी उलगडणार याची प्रेक्षकाल वाट पाहून आहेत पण तूर्तास या मालिकेतील अभिनेत्याने काही काळासाठी ब्रेक घेतलेला पाहायला मिळत आहे.अद्वैतचा भाऊ राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार येत्या दोन दिवसात विवाहबद्ध होत आहे. स्वतःच्या लगीनघाईमुळेच तो या मालिकेतून काही दिवस बाजूला आहे. इचलकरंजी येथे ध्रुव दातारची लगीनघाई सुरू झालेली आहे.

druva datar wedding halad photos
druva datar wedding halad photos

नुकतेच ग्रहमख पूजन पार पडले असून त्याच्या हळदीचा देखील थाट सजलेला पाहायला मिळत आहे. १४ मे २०२३ रोजी अक्षता तिखे सोबत ध्रुव दातार याने साखरपुडा केला होता. अक्षता तिखे आणि ध्रुव दोघेही कोलेजपासूनचे मित्र आहेत. दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मे महिन्यात त्यांनी साखरपुडा केला आणि आता डिसेंबर महिन्यात हे दोघेही विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अक्षता तिखे ही नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवलेले असून आता ती कोरिओग्राफर म्हणूनही वेगवेगळ्या इव्हेंटसाठी काम करते. Meraki नावाने तिचा स्वतःचा डान्स क्लास आहे. तर ध्रुव दातार हा सुरुवातीला झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत झळकला होता. मॉडेलिंग करता करता ध्रुवला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती.

dhruv datar wedding photos
dhruv datar wedding photos

तू चाल पुढं या मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता तो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत अद्वैतच्या भावाची भूमिका साकारताना दिसत आहे. लग्नाच्या लगबगीमुळे ध्रुवने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षताने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर्स पार्टी साजरी केली. ब्राईड टू बी असे कॅप्शन देत अक्षताने तिच्या बॅचलर्स पार्टीचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते. तर ध्रुवने देखील त्याच्या खास मित्रांसोबत गोवा ट्रिप एन्जॉय केली होती. मेंदी , ग्रहमख , हळदीच्या सोहळ्यानंतर त्यांच्या लग्नाचा थाट नेमका कसा असणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button