news

मराठी अभिनेत्याचं धुमधडाक्यात पार पडलं लग्न… लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल

स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेत कला आणि अद्वैत ची लव्हस्टोरी सुरू होण्यागोदरच हा अद्वैत आणि नयनाच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली आहे. पण लवकरच नयनाचे कटकारस्थान अद्वैतला उलगडेल आणि नंतर तो कलाच्या प्रेमात पडेल. या गोष्टीला अजून खूप अवकाश आहे तूर्तास आज मालिकेतील एका अभिनेत्याने रियाल लाईफमध्ये लग्नाची गाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. अद्वैतचा भाऊ राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार आज शुक्रवारी १४ डिसेंबर रोजी अक्षता तिखेसोबत विवाहबंधनात अडकला आहे. पुण्यात या दोघांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या समवेत ही लग्नगाठ बांधली.

dhruv datar and akshata tikhe wedding photos
dhruv datar and akshata tikhe wedding photos

लग्नाची लगबग म्हणून ध्रुवने लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून इचलकरंजी येथे त्याच्या आजोळी लग्नाच्या अगोदरच्या विधींना सुरुवात झाली होती. यावेळी ग्रहमख पूजन तसेच हळदीचा देखील थाट सजलेला पाहायला मिळाला. तर तिकडे अक्षता तिखेने मेंदीच्या सोहळ्यात एकमेकांसोबतच्या आठवणी हातावर सजवलेल्या पाहायला मिळाल्या. २०१९ पासून या दोघांची मैत्री आहे त्या आठवणी तिने मेंदीच्या स्वरूपात हातावर रेखाटल्या होत्या. काल सकाळी ध्रुव दातार वऱ्हाडी मंडळींसह पुण्याला रवाना झाला होता. लग्नस्थळी पोहोचताच गुरुवारी रात्री त्यांचा संगीत सोहळा पार पडला. अक्षता नृत्यांगना असल्याने तिने व तिच्या मैत्रिणींनी या सोहळ्याची रंगत वाढवली. ध्रुवसाठी तिने काही रोमँटिक गाण्यांवर डान्स केला होता. अक्षता ही कोरिओग्राफर असल्यामुळे संगीत सोहळ्याचा त्यांचा हा थाट पाहण्यासारखा होता.

marathi actor druv datar wedding photos
marathi actor druv datar wedding photos

१४ मे २०२३ रोजी अक्षता तिखे सोबत ध्रुव दातार याने साखरपुडा केला होता. अक्षता तिखे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती एक नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवलेले असून कोरिओग्राफर म्हणून वेगवेगळ्या इव्हेंटसाठी ती काम करते. Meraki या नावाने तिचा स्वतःचा डान्स क्लास आहे. तर ध्रुव दातार हा सुरुवातीला झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत झळकला होता. मॉडेलिंग करता करता ध्रुवला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. तू चाल पुढं या मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता तो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैतच्या भावाची भूमिका साकारताना दिसत आहे. लग्नाच्या लगबगीमुळे ध्रुवने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ध्रुव आणि अक्षताच्या लग्नाला काही मोजक्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी ध्रुव दातार आणि अक्षता तिखे या दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button