दिवाळी पहाट कार्यक्रमात थिरकणार गौतमी पाटील म्हणून … गौतमीसाठी कार्यक्रमस्थळी तरुणांची मोठी गर्दी पण आयोजकच झाले ट्रोल
आज १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये अशा कार्यक्रमाला तरूणाईंची विशेष गर्दी जमलेली पाहायला मिळाली. आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, राहुल देशपांडे, महेश काळे यांनी सुरेल गाण्यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमात विशेष रंगत आणली होती. आज ठाण्यात पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात गौतमी पाटीलला आमंत्रित करण्यात आले होते. चिंतामणी चौक, तलावपाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. सकाळी सहा वाजता या कार्यक्रमात गौतमी पाटीलने गाण्यावर नृत्य सादर केले.पूर्वांक प्रस्तुत मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात जुईली जोगळेकर हिच्यासह स्थानिक गायकांनी आपली कला सादर केली. दरम्यान कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी गौतमी पाटील हिला बोलावण्यात आले होते. गौतमी येणार म्हणून अगोदरच तरुणांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती. दिवाळी पहाटची अशी सुरुवात झाल्याने अनेकांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहराला संस्कृतीक नगरी म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील अनेक कलाकार मराठी सृष्टीत नाव लौकिक करताना दिसली आहे. या शहराने गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्याच ठाण्यात दिवाळी पहाटची सुरुवात गौतमी पाटीलच्या लावणीने व्हावी याच्या इतके दुर्भाग्य दुसरे कुठले नसेल असे ट्रोल करणाऱ्यांनी म्हटले आहे. केवळ गौतमी पाटीलला पाहण्यासाठी या ठिकाणी तरुणांची अलोट गर्दी जमलेली होती.
अशा कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावणे कितपत योग्य आहे ? असाही प्रश्न यावर उपस्थित करण्यात येत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना अनेक गावकऱ्यांनी विरोध दर्शवलेली पाहायला मिळाला. आपल्या गावातील तरुणाई भरकटली जाऊ नये या विचाराने हा एकमताने निर्णय घेण्यात आला होता. पण शहराच्या ठिकाणी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी हजारोंची झुंबड उडालेली असते. अशा कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी विविध स्तरातून केली जाते. पण राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी अशाच कार्यक्रमांना मूठमाती देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आता तर दिवाळी पहाट मध्ये सुद्धा असे बदल घडून येत आहेत हे पाहून आपली संस्कृती जपली पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे.