news

मन उडू उडू झालं मालिका फेम ऋतुराजने घेतलं स्वतःच्या हक्काचं घर… लग्नानंतरची पहिली दिवाळी हक्काच्या घरात साजरी केल्याचा आनंद

स्वतःच्या हक्काचं घर असावं या आशेने कलाकार मंडळी अहोरात्र मेहनत करत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांचे हे स्वप्न सत्यात उतरलेले पाहायला मिळाले. मन उडू उडू झालं मालिका फेम कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके याचेही घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. यंदाची ही दिवाळी त्याच्या नव्या घरात त्याने साजरी केली आहे. मन उडू उडू झालं मालिकेनंतर ऋतुराजला मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर तो अनेक मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला.

ruturaj phadke in 217 padmini dham natak
ruturaj phadke in 217 padmini dham natak

येत्या २४ तारखेला ऋतुराज फडके याची प्रमुख भूमिका असलेले २१७ पद्मिनी धाम हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकातून मिलिंद शिंदे आणि ऋतुराज प्रथमच एकत्रित काम करताना दिसत आहेत. या नाटकात अभिनेत्री अमृता पावरची त्यांना साथ मिळाली आहे. प्रमुख भूमिका असलेले पहिलेच नाटक आणि घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याने ऋतुराजचा आनंद द्विगुणित झालेला आहे. ऋतुराज म्हणतो ” स्वतःच हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. प्रीती आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे “आपलं स्वतःच हक्काचं घर”. ते कसंही असो, लहान किंव्हा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं. जानेवारी २०२३ मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात busy झालो त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहाघर ला जाऊन व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही.

ruturaj phadke wedding photos
ruturaj phadke wedding photos

अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि ओटी भरुन आलो. देवीचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली. काही दिवसां पूर्वी, आमचं “आपलं स्वतःच घर” हे स्वप्न पूर्ण झालं आणि आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतोय. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव “योगेश्वरी”. ते म्हणतात ना, “अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है”.. हे आम्ही अनुभवलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button