news

“लपंडाव” चित्रपटातील सुनील बर्वेची “ही” अभिनेत्री आजही दिसते खूपच सुंदर.. अभिनय सोडून परदेशात करते हे काम

१२ नोव्हेंबर १९९३ साली “लपंडाव” चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज ह्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे या बड्या स्टार कास्ट सोबत आणखी एक अभिनेत्री झळकलेली पाहायला मिळाली. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी रानडे खारकर”. पल्लवीने “लपंडाव ” हा पहिलाच चित्रपट साकारला होता त्यानंतर ती या झगमगत्या दुनियेपासून दूर गेली ती परत कधी दिसलीच नाही. तिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…

pallavi ranade kharkar marathi actress
pallavi ranade kharkar marathi actress

लपंडाव चित्रपटात पल्लवीने ‘मुग्धाची’ भूमिका साकारली होती. तर सुनील बर्वे याने या चित्रपटात असिमची भूमिका बजावली होती. असिमचे वर्षा उसगावकर म्हणजेच ‘रसिका’वर प्रेम होते. तर तिकडे मात्र रसिकाचे विक्रमवर प्रेम होते(अजिंक्य देव ). मुग्धा “तीन फुल्या आणि तीन बदाम” नावाने असीमला आणि रसिकाला प्रेमपत्र पाठवते. हा सगळा गोंधळ पुढे त्यांच्याच आई वडिलांवर कसा उलटतो याचे सुरेख कथानक दिग्दर्शकाने चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले. त्यावर्षी या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून पल्लवी रानडे हिला आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सई देवधर हिला पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या एकाच चित्रपटामुळे पल्लविला भरपूर प्रसिद्धी मिळाली असली तरी पुढे ती कधीच कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाली नाही.

pallavi ranade kharkar family photo
pallavi ranade kharkar family photo

परंतु असे असले तरी ती एका वेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. पल्लवीने कम्प्युटर सायन्स मधून आपले शिक्षण घेतले असल्याचे समजते. आज जवळपास १८ वर्षाहून अधिक काळापासून ती बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक डोमेनसाठी कार्यरत आहे. संयुक्त संस्थान अमेरिका (सॉल्ट लेकसिटी उताह) राहून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट लिडरशिप या क्षेत्राचाही तिला दांडगा अनुभव आहे. प्रेसिजन हेल्थ अँड रिसर्चसची ती संचालक म्हणून काम पाहतेय. पल्लवी झगमगत्या दुनियेपासून बाजूला होऊन अनेक वर्षे लोटली असली तरी तिने साकारलेली मुग्धा कायम रसिकजनांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button