‘शो मस्ट गो ऑन’ कलाकारांच्या बाबतीत अशा गोष्टींना नेहमीच प्राधान्य द्यावे लागत असते. एक कलाकार म्हटलं की आजारी असूनसुद्धा किंवा दुःखद प्रसंग ओढवला तरी प्रेक्षकांच्या खातर त्यांना आपले काम पूर्णत्वास आणावे लागते. ही त्या कलाकाराची कामाप्रति एक निष्ठा असते. प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातील अभिनेत्याला शिंगल्सचा त्रास झाला. कांजण्याच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे या कलाकाराच्या डोळ्याला आणि चेहऱ्या ला सूज आली मात्र असे असूनही आपल्यामुळे नाटक थांबले जाऊ नये याची काळजी घेत या कलाकाराने त्याच्या कामाप्रति निष्ठा दाखवत प्रयोग चालु ठेवला. अर्थात ही कुठलीही अभिमानाची गोष्ट नाही पण दुसऱ्यांचा खोळंबा होऊन नये या हेतूने या कलाकाराने शो मस्ट गो ऑन म्हणत आपले प्रयोग चालू ठेवले.
हा कलाकार म्हणजेच अतुल तोडणकर होय. अतुल तोडणकर याने आजवर मालिका तसेच चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात तो प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्यासोबत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या नाटकाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली होती. तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला अतुलला थोडा वेळ लागला. पण त्यानंतर त्याला कांजण्याचे व्हायरल इन्फेक्शन झाले. त्याने सुजलेला चेहरा आणि डोळे दाखवत तिथल्या परिस्थितीचा आढावा दिला आहे. नुकतीच ही टीम नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर आता अमेरिकेहून मायदेशी परतण्यास सज्ज झाली आहे. पण इथल्या शो मस्ट गो ऑनच्या अनुभवाबद्दल अतुल तोडणकर म्हणतो की, ‘आज एका लग्नाची पुढची गोष्ट या आमच्या नाटकाचा दुसरा अमेरिका दौरा संपला.. खूप संमिश्र आठवणी SHOW MUST GO ON.
माझा हा अमेरिका चा तिसरा दौरा..मोठेपणा मिरवत नाहीये. म्हणजे तशी इथल्या वातावरणाची सवय आणि अंदाज आलाय.. पण या वेळेस गंम्मत केली अमेरिकेने हाऊसफ़ुल्ल शो चालू होते. शिकागो, सेंट लुईस आणि डॅल्लस चा शो झाल्यावर मला शिंगल्स चा त्रास झाला.. म्हणतात की कांजन्याची वायरल इन्फेक्शन.. अर्धा चेहरा आणि डोळा सुजला होता.. पण अमेरिकेचे दर्दी रसिक प्रेक्षक, त्यांचा तुफान प्रतिसाद, आमची नाटकाची टीम आणि आमचा जादूगार प्रशांत दामले यांच्यासमवेत, त्या प्रत्येक तीन तासात काहीतरी घडायचं आणि प्रयोग पार पडायचा.. आज आमची दौऱ्याची सांगता झालीय आणि मी पूर्ववत होतो तसा झालोय.. हीच तर नाटकाची गंम्मत आहे मित्रांनो या दोन्हीही वीकएंड ला प्रत्येक सेंटरला निष्णात डॉक्टर तैनात होते, ट्रीटमेंट उत्तम चालू होती.. प्रशांत सर, आऊ, कविता आणि माझ्या संपूर्ण टीम चा मी ऋणी आहे .. Ajay- Vasudha Nihaar Patwardhan ,Atul Aranke, Rahul Karnik, सर्वांना खूप खूप प्रेम ‘ .