news

आत्मपॅम्प्लेट कळलाच नाही….चित्रपटाच्या अपयशावर स्वतः दिग्दर्शकाचं उत्तर

आजवर परेश मोकाशी आणि मधूगंधा कुलकर्णी या दाम्पत्याने दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. पण नुकताच रिलीज झालेला आत्मपॅम्प्लेट हा त्यांचा चित्रपट अपयशी ठरलेला पाहायला मिळाला. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे लेखन केले होते. ६ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या नावाने चित्रपट आलाय हेच लोकांना माहीत नसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत तेव्हा मनसे त्यांच्या मदतीला धावून जात असते. पण स्वतः अमेय खोपकर हा चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावतात तेव्हा थिएटर अक्षरशः रिकामं आल्याचं त्यांना कळतं. चित्रपट चांगला असूनही प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दी करत नाहीत. तेव्हा मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?. असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता. पण ज्या चित्रपटाचे मार्केटिंग होत नाही तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहीचतच नाही हा मुद्दा प्रेक्षकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली. दरम्यान चित्रपटाच्या नावारूनही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.

ashish bende director
ashish bende director

या सर्वांवर चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “आत्मपॅम्फ्लेटच्या निमित्ताने…पुरेसे शोज नसणे आणि प्रेक्षक संख्या कमी असणे बाबत काही दर्दी प्रेक्षकांकडून आक्षेप किंवा निरीक्षणं नोंदवली गेली. त्यांचं सिनेमावर प्रेम असल्यामुळेच त्यांनी कळकळीने मतं नोंदवली असणार हे अर्थातच गृहीत धरून पुढील पोस्ट करतो. आक्षेप 1- नाव कळत नाही. बोध होत नाही. सोप्प सुटसुटीत कळेल असं नाव असावं. मला काय वाटत- कांतारा नावाचा अर्थ आपल्याला माहिती नसूनही या नावाच्या एका कन्नड चित्रपटाला महाराष्ट्राने उचलून धरलं. खूप पैसे कमावले त्या चित्रपटाने. ही वस्तुस्थिती आहे. आणि गेल्याच वर्षीची आहे. आक्षेप 2- मोठी नावं, अभिनेते नाहीत. मला काय वाटतं- परत उदाहरण कांतारा. कोण ओळखतो आपल्यापैकी त्या चित्रपटातील ऍक्टर्स ना? तरीही सुपर हिट आहेच तो सिनेमा. आक्षेप 3- एकच गाणं आहे. मला काय वाटतं- आमच्या एलिझाबेथ एकादशी मधे सुद्धा एकच गाणं होतं. किंवा परत कांताराची किती गाणी आठवतात?

Aatmapamphlet marathi movie
Aatmapamphlet marathi movie

सो माझं एवढंच मत आहे की प्रेक्षक हुशार असतो, त्याला नाव, पॉप्युलर चेहरे आणि गाणी याने काहीच फरक पडत नसतो. किंवा आपण जेवढा समजतो तेवढा फरक पडत नसतो. माझ्यामते ही सर्व मिथकं आहेत. ती गळूनच पडली पाहिजेत. नाहीतर आपण नवीन चित्रपट प्रयोग कसा करणार? अंतिमतः मार्केटिंग, पब्लिसिटीच्या विवीध क्लुप्त्या करून प्रेक्षकांपर्यंत तुमचं प्रॉडक्ट म्हणजेच चित्रपट पोहोचवावा लागतो. आणि माझ्या मते इथे आम्ही कमी पडलो असू. त्याचीही विविध कारणं असतात, उदाहरणार्थ बजेट. ” शेवटी आशीषने “ही माझी मतं आहेत, चुकीची असूच शकतात की” असंही म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button