news

मराठमोळा अभिनेता आणि कॉमेडीयन होणार बाबा …पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

मराठमोळा कॉमेडियन, अभिनेता, डॉक्टर आणि छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवलेला संकेत भोसले लवकरच बाबा होणार आहे. कॉमेडियन सुगंधा मिश्रा सोबत संकेतने लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर आता या दोघांनी पहिल्यांदाच आई बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. संकेत आणि सुगंधा हे हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. संकेत अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध आहे, विशेषत: सलमान खान आणि संजय दत्त, मिथुन, फरहान अख्तर, जावेद अख्तर अशा सेलिब्रिटींची तो नक्कल करतो. सोशल मीडियावर त्याच्या मजेशीर व्हिडिओचे अनेजण चाहते आहेत.

sanket bhosle with wife Suganda Mishra Bhosle
sanket bhosle with wife Suganda Mishra Bhosle

तर सुगंधा मिश्रा लता दिदींच्या आवाजाची नक्कल करते. सुगंधा गायिका देखील आहे पण विनोदी शोमधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अभिनयाच्या जोडीला संकेत भोसले हा पेशाने डॉक्टर आहे. पण अंगी असलेल्या कलागुणांमुळे त्याने या क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. त्याने २०१२ च्या लाफ इंडिया लाफद्वारे मिमिक्री क्षेत्रात पदार्पण केले होते जिथे तो टॉप १० अंतिम स्पर्धकांमध्ये होता. त्याने २०१३ मध्ये ९२.७ बिग एफएमवर काम केले आहे. सुगंधा आणि संकेतने २०२१ मध्ये सोशल मीडियावर त्यांचे नाते अधिकृत केले होते. आपल्या लेडी लव्हसोबतचा एक गोड फोटो शेअर करताना संकेतने ही बातमी जाहीर केली होती. २६ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे लग्न खाजगी समारंभात पार पडले होते. पण नंतर ही गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता.

actress sugandha mishra bhosle baby bump
actress sugandha mishra bhosle baby bump

सुगंधा आणि संकेत सध्या त्यांच्या पहिल्या वहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपचे फोटोसेशन केले होते. त्यातील काही खास फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून सेलिब्रिटींनी दोघांचे अभिनंदन केले आहे. सुगंधा आणि संकेतचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. संकेत त्याच्या विनोदी व्हिडिओसाठी ओळखला जातो. ‘बेचारी को फिरसे रुला दिया’ ही त्याची सिरीज खूपच लोकप्रिय आहे. त्याचमुळे बाबू आणि बेब्स या नावाने संकेतला ओळख मिळाली आहे. तूर्तास सुगंधा आणि संकेत आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहेत. चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सुगंधाला या दिवसात काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button