serials

झी मराठीवर दाखल होतेय नवी मालिका…या अभिनेत्याला ओळखलं का

झी मराठी वाहिनीने नुकतीच २५ वर्ष पूर्ण केली आहेत. आजवर या वाहिनीने अनेकांना अभिनयाची नुसतीच संधी मिळवून दिली नाही तर त्यांचे करिअरही घडवलं आहे. झी मराठीचा प्लॅटफॉर्म मिळाला की कलाकाराला प्रसिद्धी मिळतेच हे एक ठरलेलं गणित म्हणावं लागेल. पण गेल्या तीन वर्षात झी मराठीचा टीआरपी कुठेतरी खाली घसरलेला पाहायला मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यासाठी वाहिनी नवनवीन प्रयोग घडवून आणत आहे. अगदी हिंदी चित्रपट, मालिका गाजवणाऱ्या कलाकारांना झी वाहिनीने मालिका सृष्टीत आणून टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न केले. राकेश बापट, अक्षय म्हात्रे, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या कलाकारांना झी मराठीने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर संधी दिली. याच जोडीला आता आणखी एक कलाकार महत्वाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लवकरच झी मराठी वाहिनी एक नवीन मालिका घेऊन येत आहे.

नुकतेच ड्रामा ज्युनिअर्सचा रिऍलिटी शो संपलेला पाहायला मिळाला. त्यामुळे येत्या काही दिवसांत झी मराठी वाहिनी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या मालिकेचे नाव आहे “लक्ष्मी निवास” काही दिवसांपूर्वी झी मराठीने या मालिकेबद्दल एक हिंट दिली होती. पण नुकताच या मालिकेचा पहिला ट्विस्ट प्रेक्षकांच्या समोर आलेला पाहायला मिळत आहे. एका पाठमोऱ्या वयस्कर कलाकाराची झलक या व्हिडिओतून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा कलाकार कोण आहे याबद्दल तर्क लावले जात आहेत. पाठमोरा दिसणारा हा कलाकार तुम्ही ओळखला असेलच कारण या कलाकाराने आजवर अनेक चित्रपट मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे.

actor tushar dalvi in laxminiwas new serial on zee marathi
actor tushar dalvi in laxminiwas new serial on zee marathi

हा कलाकार म्हणजेच अभिनेते “तुषार दळवी” होय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तुषार दळवी मराठी मालिकेकडे वळले आहेत. याअगोदर ते मेरे साई या हिंदी मालिकेत साईबाबांची भूमिका साकारताना दिसले होते. तसेच कलर्स मराठीच्या भाग्य दिले तू मला या मालिकेत ते निवेदिता सराफ यांच्यासोबत दिसले. पण आता तुषार दळवी झी मराठीच्या लक्ष्मी निवास मालिकेत पुन्हा एकदा दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. लक्ष्मी निवास ही मालिका कौटुंबिक असणार हे गृहीत धरूनच मालिकेच्या कथानकाचा अंदाज लावला जातो. दरम्यान तुषार दळवी यांच्यासह आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या दमदार एन्ट्रीसाठी तुषार दळवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button