news

लग्नानंतर ८ वर्षात बिनसलं…उर्मिला मातोंडकर पती मोहसीन पासून घेणार घटस्फोट

९० च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारी आणि आता राजकीय धुरा संभावणारी उर्मिला मातोंडकर लवकरच घटस्फोट घेत असल्याची चर्चा सुरू आहे. उर्मिला मातोंडकर हिने २०१६ मध्ये मोहसीन मीर सोबत लग्न केले होते. पण आता लग्नाच्या ८ वर्षानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. उर्मिलाने घटस्फोटासाठी अगोदरच अर्ज दाखल केला असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशीही बातमी समोर आली आहे. उर्मिला मातोंडकर हिने अजून या प्रक्रियेबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही पण मिळालेल्या माहितीनुसार ती या प्रक्रियेला सामोरी जात आहे असे स्पष्ट झाले आहे.

urmila matondkar husband Mohsin Akhtar Mir
urmila matondkar husband Mohsin Akhtar Mir

उर्मिलाने त्याच्याशी लग्नगाठ बांधली तो मोहसीन अख्तर मीर हा मूळचा काश्मीरचा आहे. मोहसीन हा उर्मिलापेक्षा १० वर्षाने लहान असल्याचे बोलले जाते. मोठा बिजनेसमन असल्याने उर्मिलाने त्याच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर उर्मिला क्वचितच अभिनय क्षेत्रात पाहायला मिळाली होती. पण अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच तिने राजकारणाचीही वाट धरली होती. राजकारणात उतरताच तिने अनेक दौरे देखील केलेले पाहायला मिळाले.

urmila matondkar divorce news
urmila matondkar divorce news

उर्मिला मातोंडकर ही लहान असल्यापासूनच हिंदी मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकली होती. ९० च्या दशकातील अनेक हिट चित्रपटात ती नायिका म्हणून पुढे आहे होती. माधुरी दीक्षितप्रमाणे उर्मिलानेही हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. पुढे म्हणावे तसे काम मिळत नसल्याचे पाहून तिने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. कंगना राणावतच्या विरोधात तिने अनेकदा वक्तव्य केलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता घटस्फोटाच्या चर्चेमुळे उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button