2016 साली झी मराठी वाहिनीवर सर्वोत्तम गाजनारी मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. त्यावेळी राणादाच्या “चालतयं की”, या डायलॉगने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावून ठेवलं होतं. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांच्या तोंडात फक्तं राणादाचेचं डायलॉग. राणादाचा भाऊ सूरज हा देखिल उत्तम अभिनय करायचा. अशातच मालिकेमध्ये लहानपणीचा राणादा आणि त्याचा भाऊ सूरज दाखवला गेला होता. दरम्यान लहान सूरजचे पात्र साकारणारा मुलगा नेमका कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या….
राणादाच्या सिरीयलमधिल लहान सुरजचे पात्र साकारणाऱ्या मुलाचं नाव ‘सिद्धेश मुकुंद खुपेकर’ असं असून हा मुलगा एक उत्तम अभिनेता आहे. एवढेच नाही तर, सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक ‘मुकुंद वसंत खूपेकर’ यांचा हा मुलगा आहे. सिद्धेश हा अवघ्या तेरा वर्षांचा असून त्याने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत यशाची बाजी मारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सिद्धेशने तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधील लहान सूरजचे पात्र साकारले होते. त्यानंतर सिद्धेश आपल्याला ‘सन मराठी’ या वाहिनीवरील ‘संत गजानन शेगावीचे’ या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर त्याने घुसमट, मेंटॅलिटी अशा प्रकारच्या शॉर्टफिल्ममध्ये देखिल काम केलं आहे. मुकुंद वसंत खुपेकर हे एक लेखक असुन त्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं, आभाळाची माया, लेक झाली दुर्गा, ज्योतिबा, तुझ्यात जीव रंगला, बापमाणूस, प्रेमाचा गेम, जीव झाला येडा पिसा या मालिकांमध्ये काम केलं आहे.
एवढेच नाही तर त्यांनी, स्पर्श, कारवान, कबीर, प्रतिज्ञा अशा नाटकांमध्ये काम करून रंगमंचाचा अनुभव अवगत केला आहे. वसंत खूपेकर यांनी त्यांचं बी.ए. पर्यंतचं शिक्षण कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केलं. पुढे त्यांनी कोल्हापूरमधील ‘बालाजी पेंढारकर फिल्म अँड थिएटर अकॅडमी’ येथून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. एवढेच नाही तर त्यांनी घुसमट, परिस, डिफरन्स, हरवलेल्या गाभाऱ्यापलीकडे, राडा, देवघर या लघुपटांची निर्मिती केली आहे. फक्तं मालिकांमधूनच नाही तर, वसंत खुपेकर हे एक गाव पुढे आहे, कर्मवीरांयन, डार्लिंग, मांडव वेल, विठ्ठला शपथ, शिवगड पोलीस स्टेशन या चित्रपटांमध्ये झळकले आहेत.