महाराष्ट्र पाहत असलेली हि टॉप १० ची यादी … सोशल मीडिया स्टारमुळे बिगबॉसच्या शोला मोठा डिमांड तर पारू मालिका
कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनने चांगलीच लोकप्रियता मिळवलेली आहे. आजवरच्या मराठी बिग बॉसच्या सिजनमध्ये यंदाचा सिजन प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. त्यामुळे टीआरपीच्या बाबतीत हा पाचवा सिजन चांगली रेटिंग मिळवताना दिसत आहे. २८ जुलै रोजी बिग बॉस मराठीच्या ५ व्या सिजनचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला होता. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे टीआरपीच्या यादीत हा शो १५ व्या स्थानावर येऊन पोहोचला. आजवर स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीने या टीआरपी यादीत वर्चस्व गाठले होते. पण आता कलर्स मराठीने झी मराठीच्या मालिकांना तगडी टक्कर दिलेली पहायला मिळत आहे. पारू ही झी मराठीची एकमेव मालिका टॉप १४ च्या यादीत असताना बिग बॉसने १५ वा क्रमांक गाठला आहे.
याच मालिका आणि शो ऑनलाइन पाहणारा प्रेक्षकवर्ग सुद्धा खूप मोठा आहे. ठरलं तर मग या स्टार प्रवाहच्या मालिकेला ऑनलाइन टीआरपी देखील चांगला मिळत आहे. ही मालिका आजही तिचे पहिले स्थान अबाधित ठेवून आहे. ऑनलाइन टीआरपीमध्ये कलर्स मराठीच्या बिग बॉसला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून यंदाच्या सिजनने ४ थ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. ठरलं तर मग या मालिकेला ऑनलाइन टीआरपी मध्ये सर्वात जास्त ३९.६ रेटिंग मिळाला आहे. त्या खालोखाल प्रेमाची गोष्ट आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला अनुक्रमे ३८.५ आणि ३७.६ असा रेटिंग मिळाला आहे. तर मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनला ३७.२ असा रेटिंग मिळाला आहे. सोशल मीडिया स्टारमुळे यंदाच्या सिजनला मोठा डिमांड आलाय.
कलर्स मराठीचा हा एकमेव शो आहे ज्याने ऑनलाइन टीआरपीच्या टॉप पाचव्या यादीत प्रवेश मिळवला आहे. रविवारी पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने बिग बॉसच्या या यशाचे कौतुक केलं होतं. प्रेक्षकांनी यंदाच्या सिजनला चांगली पसंती दिली आहे त्यामुळे हा रेटिंग वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला मराठी बिग बॉसने सोशल मीडिया स्टार्सना का संधी दिली असे प्रश्न विचारले होते. पण सूरज, डीपी, अंकिता या सोशल मीडिया स्टार्सने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. याचाच परिणाम शोच्या टीआरपीवर पडलेला पाहायला मिळतो आहे.